Sea Salt for Hair: केसांसाठी कसे फायदेशीर आहे सी सॉल्ट? जाणून घ्या ते कसे वापरावे
Hair Care With Sea Salt: आरोग्य असो वा ब्युटी, मीठ जेवढे फायदेशीर आहे, तेवढेच ते नुकसानकारक देखील आहे. स्किन केअर प्रमाणेच हेअर केअरसाठी सी सॉल्ट फायदेशीर आहे. त्याचे फायदे आणि ते कसे वापरावे येथे जाणून घ्या.
Benefits of Sea Salt for Hair: आरोग्यासाठी मीठ आवश्यक असलं तरी ते जास्त झाले तर ते घातक असते. तसेच त्याच्या कमतरतेमुळे सुद्धा अनेक समस्या उद्भवू शकतात. आरोग्याप्रमाणेच हल्ली अनेक ब्युटी प्रोडक्ट्स मध्ये मीठाचा वापर केला जातो. अनेक तज्ञ पाण्यात आंघोळीसाठी मीठ किंवा एप्सम सॉल्ट वापरण्याचा सल्ला देतात. कारण असे मानले जाते की ते तुमच्या त्वचेसाठी फायदेशीर आहे. पण आता हे जाणून घ्या की, काय सी सॉल्ट स्किनसोबतच तुमच्या केसांसाठी देखील फायदेशीर आहे की नाही. जसे जास्त मीठ खाणे आरोग्यासाठी घातक ठरू शकते तसेच ते स्किनसाठी देखील अपायकारक ठरू शकते. सी सॉल्ट केसांसाठी फायद्याचे आहे की ते केसांचे मूळ कमजोर करतील? जाणून घ्या याबाबत सविस्तर
ट्रेंडिंग न्यूज
काय आहे सी सॉल्ट?
टेबल मीठ सोडियम क्लोराईडपासून बनवले जाते, जो एक रासायनिक पदार्थ आहे. दुसरीकडे, सी सॉल्ट समुद्राच्या पाण्याचे बाष्पीभवन करून तयार होते. त्यामुळे हे सहसा नैसर्गिक असते. हे मॅग्नेशियम आणि पोटॅशियम सारख्या महत्त्वाच्या खनिजांची पातळी राखते. वास्तविक समुद्री मीठ केसांसाठी चांगले आहे की नाही याचे कोणतेही सरळ उत्तर नाही. हे सर्व तुमच्या केसांच्या प्रकारावर अवलंबून आहे आणि सी सॉल्ट तुमच्या केसांवर कसे रिएक्ट करते.
केसांसाठी कसे फायदेशीर आहे सी सॉल्ट
ऑइली स्काल्पसाठी फायदेशीर
तेलकट केस स्काल्पवरील अति सक्रिय सेबेशियस ग्रंथींमुळे उद्भवतात, जे जास्त तेल तयार करतात. ही समस्या सी सॉल्टने सोडविली जाऊ शकते. तुमचे केस धुण्यासाठी तुम्हाला फक्त तुमच्या शैम्पूमध्ये एक चमचा सी सॉल्ट टाकावे लागेल. यानंतर मीठ तुमच्या केसांमधून अधिक तेल शोषून घेईल.
अँटी डँड्रफ आहे
डोक्यातील डँड्रफ हा स्काल्पवरील एक थर आहे, जो डेड स्किनच्या पेशींचे छोटे छोटे तुकडे बनवतो. मीठ डोक्यातील कोंडा दूर करण्यास सक्षम आहे, ते स्काल्पवर होणाऱ्या फंगसपासून संरक्षण करते. तुमच्या केसांवर आणि स्काल्पवर १ ते २ चमचे मीठ स्प्रिंकल करा. नंतर ओल्या बोटांनी साधारण १० मिनीट हलक्या हाताने मसाज करा. यानंतर नेहमीसारखे केस धुवून घ्या.
केसांच्या वाढीसाठी
केसांच्या वाढीसाठी समुद्री मीठ योग्य आहे. तुम्ही जर केस गळतीमुळे त्रस्त असाल, तर तुम्ही सी सॉल्ट वापरले पाहिजे. तुमचे केस नेहमीप्रमाणे धुवून घ्या. नंतर सुमारे १० ते १५ मिनीट समुद्राच्या मीठाने ओल्या स्कॅल्पची मालिश करा. तुम्हाला तुमच्या केसांची हळूहळू वाढ दिसू लागेल.
सी सॉल्टचा जास्त वापराने होऊ शकते नुकसान
समुद्री मीठाचा जास्त प्रमाणात वापर केला तर ते तुमच्या केसांना नुकसान देखील होऊ शकते. जर तुमचे केस ऑइली नसतील तर ते तुमचे केस फ्रिजी करू शकते. हे वापरल्यानंतर तुमचे केस जास्त गुंतू शकतात. हे केसांमधील ओलावा काढून घेते. त्यामुळे तुमचे केस खराब होऊ शकतात. त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या केसांवर सी सॉल्ट वापरायचे असेल तर प्रथम त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
विभाग