Dandruff Remedy: कोंडा दूर करण्यासाठी बेस्ट आहे हा घरगुती उपाय, लगेच दिसेल फरक
Home Remedy for Dandruff: अनेक वेळा केसांचा कोंडा इतका वाढतो की तो दिसू लागतो. अशा परिस्थितीत ते लाजिरवाणे ठरते. यापासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही हा घरगुती उपाय ट्राय करू शकता.
Coconut Oil and Lemon Juice Remedy for Dandruff: तसं तर केसांमध्ये कोंडा म्हणजेच डँड्रफ होणे ही एक सामान्य समस्या आहे. या समस्येमध्ये टाळूवर बिल्ड-अप जमा होतो, जो किंचित खाजवल्यावर पडू लागतो किंवा केसांवर दिसू लागतो. या समस्येला सामोरे जाण्यासाठी विविध प्रकारच्या टिप्स आणि पद्धतींचा अवलंब केला जाऊ शकतो. परंतु सर्वात सोपी पद्धत म्हणजे खोबरेल तेलाची मालिश. केवळ या तेलाची मालिश केल्याने फायदा होणार नाही तर आपल्याला त्यात दुसरे तेल मिसळावे लागेल. जाणून घ्या, खोबरेल तेलात काय मिसळून लावल्याने कोंडा कमी होईल.
ट्रेंडिंग न्यूज
कोंडा दूर करण्यासाठी काय लावावे?
कोंडा दूर करण्यासाठी तुमच्या आजींनी तुम्हाला अनेक उपाय सांगतिले असतील. पण खोबरेल तेल लावणे सर्वात सोपे आहे. केसांना पोषण देण्यासाठी खोबरेल तेल सर्वोत्तम आहे. त्यात व्हिटॅमिन ई सुद्धा चांगल्या प्रमाणात असते. या तेलात लिंबाचा रस घालू शकता.
खोबरेल तेलात मिक्स करा लिंबू
कोंडापासून सुटका मिळवण्यासाठी खोबरेल तेलात लिंबाचा रस मिसळून लावल्यास फायदा होतो. वास्तविक लिंबूमध्ये आम्लयुक्त गुणधर्म असतात जे केस स्वच्छ करण्याचे काम करतात. हे नारळच्या तेलात मिसळून लावल्याने केसांमधील कोंडा दूर होतो. ते लावण्यासाठी केसांच्या लांबीनुसार खोबरेल तेल घ्या आणि त्यात लिंबाचा रस घाला. हे मिश्रण केसांना लावा. किमान १५ ते २० मिनिटे तसेच राहू द्या. नंतर शॅम्पूने स्वच्छ करा. तुम्ही ते आठवड्यातून एकदा किंवा दोनदा लावू शकता.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
विभाग