मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Summer Hair Care: कडक उन्हामुळे केस खराब झाले? या टिप्सने पुन्हा येईल चमक

Summer Hair Care: कडक उन्हामुळे केस खराब झाले? या टिप्सने पुन्हा येईल चमक

Hiral Shriram Gawande HT Marathi
May 29, 2023 01:26 PM IST

Hair Protection Tips: उन्हाळ्यात कडक उन्हामुळे केसांची स्थिती बिघडते. या दरम्यान केस खूप रफ आणि खराब होतात. केस पुन्हा कसे दुरुस्त करायचे ते येथे जाणून घ्या-

उन्हापासून केसांचे संरक्षण करण्यासाठी टिप्स
उन्हापासून केसांचे संरक्षण करण्यासाठी टिप्स

Tips to Protect Hair in Summer: उन्हाळ्यात केस खूप कोरडे होतात आणि खराब होतात. हे तीव्र उन्हामुळे होते. त्यामुळे केस पांढरेही होऊ शकतात. याशिवाय उन्हाळ्यात खूप घाम येतो. त्यामुळे केसांचे मुळं कमजोर होतात. उन्हाळ्यात कडक उन्हामुळे होणाऱ्या समस्यांना तोंड देण्यासाठी तुम्ही काही टिप्स अवलंबू शकता.

योग्य प्रकारे करा हेअर वॉश

उन्हाळ्यातील समस्यांना तोंड देण्यासाठी केस योग्य प्रकारे धुणे आवश्यक आहे. तुमचे केस कोरडे असल्यास तुम्ही आठवड्यातून दोनदा केस धुवू शकता. परंतु शॅम्पू कमी वापरा. केस तेलकट असतील तर केस व्यवस्थित शॅम्पू करा. दमट हवामानात दररोज केस धुणे शक्य आहे. शॅम्पू केल्यानंतर केस पाण्याने चांगले धुवावेत.

खराब झालेल्या केसांसाठी टिप्स

उन्हाळ्यात केस खूप रफ आणि खराब होतात. या प्रकारचे केस बरे करण्यासाठी तुम्ही घरगुती उपाय अवलंबू शकता. यासाठी अॅपल सायडर व्हिनेगर, मध आणि एक अंडे चांगले मिक्स करा. हे मिश्रण टाळूवर चांगले लावा आणि नंतर मसाज करा. थोडा वेळ राहू द्या. नंतर केस धुवा.

या टिप्स आहेत उपयोगी

केस धुल्यानंतर तुम्ही काही घरगुती गोष्टी वापरू शकता. यासाठी पाण्यात चहाची पाने टाकून गरम करा. उकळी आल्यावर गाळून घ्या आणि नंतर पाण्यात लिंबाचा रस घाला. आता या पाण्याने केस धुवा, पाणी जास्त गरम नसावे हे लक्षात ठेवा.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel