Hair Care: मेहंदीमध्ये मिक्स करा ही एक गोष्ट, गुडघ्यापर्यंत लांब होतील केस
Henna Hair Mask: लांब केस सौंदर्यात भर घालतात. जर तुम्हाला लांब केस हवे असतील तर तुम्ही मेहंदीमध्ये ही एक गोष्ट मिक्स करून लावू शकता. यामुळे केस लवकर वाढण्यास मदत होईल. हा हेअर मास्क कसा बनवायचा ते जाणून घ्या.
Henna and Onion Hair Mask for Long Hair: लांब आणि दाट केस मिळविण्यासाठी महिला सर्व प्रकारच्या टिप्सचा अवलंब करत असतात. व्यस्त जीवनशैलीमुळे नियमितपणे या रेमेडीचे पालन करणे कठीण होते. पण जर तुम्हाला लांब केस आवडत असतील तर तुम्हाला आठवड्यातून एक दिवस स्वतःसाठी काढावा लागेल. लांब केस येण्यासाठी तुम्ही मेहंदी हेअर मास्क वापरू शकता. जाणून घ्या मेहंदीने हेअर मास्क कसा बनवायचा
ट्रेंडिंग न्यूज
हा हेअर मास्क तयार करण्यासाठी तुम्हाला आवश्यक आहे...
- मेहेंदी
- कांद्याचा रस
- मेथी पावडर
- दही
कसे बनवावे
मेहंदीपासून हेअर मास्क बनवण्यासाठी लोखंडी कढईत किंवा कोणत्याही भांड्यात मेहंदी पावडर, कांद्याचा रस, दही आणि मेथी पावडर चांगले मिक्स करा. या पॅकचे सर्वोत्तम परिणाम मिळविण्यासाठी ते रात्रभर भिजवू द्या. त्यानंतर दुसऱ्या दिवशी हा पॅक लावा.
कसा अप्लाय करायचा
केसांना मेहंदी पॅक लावणे सोपे आहे. इतर कोणत्याही पॅकप्रमाणे, हे केसांच्या मुळांवर आणि लांबीवर देखील लागू केले जाते. हा पॅक नीट लावल्यानंतर किमान २५ ते ३० मिनिटे ठेवा आणि नंतर पाण्याने स्वच्छ करा.
केस वाटू शकतात कोरडे
काही लोकांना मेहंदीचे पॅक लावल्यानंतर केस कोरडे होऊ शकतात. अशा वेळी पॅक काढून टाकल्यानंतर केसांना तेलाने मालिश करू शकता. तेल लावल्यानंतर दुसऱ्या दिवशी केस शॅम्पूने धुवावेत.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
विभाग