मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Stuffed Capsicum: नेहमीची भाजी नाही तर बनवा स्टफ्ड शिमला मिरची, सोपी आहे ही रेसिपी

Stuffed Capsicum: नेहमीची भाजी नाही तर बनवा स्टफ्ड शिमला मिरची, सोपी आहे ही रेसिपी

May 30, 2023 01:13 PM IST

Veg Recipe: जर तुम्हाला रोजच्या जेवणाचा कंटाळा आला असेल तर जेवणाच्या मेनूमध्ये काही बदल करणे आवश्यक आहे. नेहमीची तीच ती भाजी खाण्याऐवजी बनवा स्टफ्ड शिमला मिरची. ही रेसिपी खूप सोपी आहे.

स्टफ्ड शिमला मिरची
स्टफ्ड शिमला मिरची

Tasty Stuffed Capsicum Recipe: शिमला मिरची मुख्यतः जंक फूडमध्ये आणि चायनीजमध्ये वापरली जाते. मग ते चाउमीन असो वा पिझ्झा, किंवा इतर कोणताही व्हेजिटेबल स्नॅक्स असो, शिमला मिरची शिवाय चव आणि वास अपूर्ण आहे. शिमला मिरची अजिबात तिखट नसते आणि त्याची चव आणि सुगंध त्याला खास बनवते. जर तुम्ही शिमला मिरचीचे शौकीन असाल, तर तुम्ही पोळी किंवा वरण-भातासोबत चविष्ट भरलेली शिमला मिरचीची भाजी बनवू शकता. चला तर मग जाणून घेऊया टेस्टी स्टफ्ड शिमला मिरची कशी बनवायची.

स्टफ्ड शिमला मिरची बनवण्यासाठी साहित्य

- ४-५ शिमला मिरची

ट्रेंडिंग न्यूज

- ३ उकडलेले बटाटे

- अर्धी वाटी पनीर किसलेले

- अर्धी वाटी बारीक चिरलेला कांदा

- दोन गाजर बारीक चिरून

- अर्धा टीस्पून बारीक चिरलेले आले

- अर्धा टीस्पून बारीक चिरलेली हिरवी मिरची

- ४ चमचे तेल

- अर्धा टीस्पून जिरे

- एक चतुर्थांश टीस्पून हळद

- धनेपूड

- लाल तिखट

- जिरेपूड

- गरम मसाला

- आमचूर पावडर

- चवीनुसार मीठ

- तेल

स्टफ्ड शिमला मिरचीची भाजी बनवण्याची पद्धत

सर्वप्रथम लहान आकाराचे शिमला मिरची धुवून पुसून घ्या. नंतर वरील देठ कापून आतील बिया काढून टाका. स्टफिंग तयार करण्यासाठी एका भांड्यात उकडलेले बटाटे घ्या. चांगले मॅश करा. पनीर देखील मॅश करा. कढईत तेल गरम करा. तेल गरम झाल्यावर त्यात शिमला मिरची टाका आणि थोडा मऊ करा आणि एका प्लेटमध्ये शिमला मिरची काढून घ्या. आता उरलेल्या तेलात जिरे टाका. त्यात हिरवी मिरची व बारीक चिरलेले आले घालून परतावे. सोबत कांदा घाला. लाल होईपर्यंत भाजून घ्या. नंतर त्यात हळद, जिरेपूड, लाल तिखट टाका. सर्व मंद आचेवर चांगले भाजून घ्या. गरम मसाला आणि धणेपूड टाकल्यावर त्यात गाजर घालून ढवळावे. चवीनुसार मीठ घालावे. उकडलेले बटाटे आणि मॅश केलेले पनीर घालून नीट परतून घ्यावे. आणि गॅस बंद करा. आता हे मिश्रण थोड्या तेलात परतलेल्या सिमला मिरचीमध्ये भरा. कढईत तीन ते चार चमचे तेल टाकून त्यात सर्व भरलेले शिमला मिरची शिजण्यासाठी ठेवा. झाकण ठेवून सुमारे १० मिनिटे शिजवा. 

शिमला मिरची झाकण उघडून आणि फ्लिप करून तपासा. जेणेकरून ते सर्व बाजूंनी शिजेल. तुमचे चविष्ट स्टफ्ड शिमला मिरचीची भाजी तयार आहे. पोळी, पराठा किंवा वरण-भातासोबत सर्व्ह करा.

WhatsApp channel