Bhalla Papdi Chaat Recipe: चटपटीत स्ट्रीट फूड खायला सगळ्यांनाच आवडते. पाणी पुरी असो वा समोसाचाट, चाटचे कितीतरी प्रकारांचा लोक आस्वाद घेत असतात. प्रत्येक पदार्थाची आपली एक वेगळी चव आहे. तुम्हाला सुद्धा काहीतरी चटपटीत खायची इच्छा होत असेल तर ट्राय करा दही भल्ला पापडी चाट. थंड थंड दह्यासोबत हे चाट थंडावा देण्यासोबतच तोंडाची चवही अप्रतिम बनवतो. तुम्ही हे घरीही बनवू शकता. थंड-थंड भल्ला पापडी चाट बनवण्याची सोपी पद्धत जाणून घ्या.
भल्ला तुम्ही उडीद डाळ बारीक करून बनवलेल्या पेस्टपासून देखील बनवू शकता. पण आम्ही तुम्हाला रव्याचे भल्ले कसे बनवयाचे याबद्दल सांगत आहोत.
- रवा
- दही
- हिरवी मिरची
- आले
- बेकिंग सोडा
- पापडी
- मीठ
- चाट मसाला
- तिखट
- तळण्यासाठी तेल
- कोथिंबीर
- चिंचेची आंबट गोड चटणी
भल्ला बनवण्यासाठी सर्वप्रथम एका बाऊलमध्ये रवा आणि दही मिक्स करून घ्या. यात मीठ, आले आणि हिरवी मिरची टाका. आता हे बॅटर झाकून साधारण १० ते १५ मिनीटांसाठी बाजूला ठेवून द्या. भल्ला बनवण्यापूर्वी बॅटरमध्ये बेकिंग सोडा टाका आणि मिक्स करा. या बॅटरचे हाताने छोटे छोटे गोळे बनवा आणि तेलात तळून घ्या. तळल्यानंतर लगेच हे भल्ले थंड पाण्यात भिजवून ठेवा. असे केल्याने यातील तेल निघून जाईल आणि भल्ले सॉफ्ट सुद्धा होतील. आता एका सर्व्हिंग प्लेट मध्ये भल्ले घ्या. त्यावर थंड थंड दही टाका. यावर लाल तिखट, मीठ आणि चाट मसाला टाका. तुम्ही दहीमध्ये थोडी साखर आणि मीठ टाकून चांगले फेटून घेऊ शकता. आता यावर चिंचेची आंबट गोड चटणी टाका. आता यावर पापडीचा चुरा करून टाका. कोथिंबीरने गार्निश करा.
तुम्हाला आंबट गोड सोबत थोडे तिखट टेस्ट हवी असेल तर तुम्ही यावर थोडी हिरवी चटणी सुद्धा टाकू शकता. तुमचा भल्ला पापडी चाट रेडी आहे.
संबंधित बातम्या