मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Shrikhand Recipe: होममेड श्रीखंड वाढवेल होळीच्या सेलिब्रेशनची मजा! जाणून घ्या रेसिपी

Shrikhand Recipe: होममेड श्रीखंड वाढवेल होळीच्या सेलिब्रेशनची मजा! जाणून घ्या रेसिपी

Mar 07, 2023 11:55 AM IST

Indian Sweet Dish: जर तुम्ही आत्तापर्यंत श्रीखंड बनवले नसेल तर आमच्या नमूद केलेल्या पद्धतीच्या मदतीने ते अगदी सहज तयार करता येईल.

होममेड श्रीखंड रेसिपी
होममेड श्रीखंड रेसिपी (Freepik)

Holi 2023: पारंपारिक गोड पदार्थ श्रीखंड आवडणाऱ्यांची कमी नाही. श्रीखंड कोणत्याही खास प्रसंगी आवर्जून खाल्ले जाते. होळी हा देखील असाच एक प्रसंग आहे जेव्हा श्रीखंड बनवून आनंदाचा गोडवा आणखी वाढवता येतो. जर तुम्ही घरी होळी साजरी करत असाल तर तुम्ही तुमच्या मित्र आणि नातेवाईकांसाठी बनवलेल्या गोड पदार्थांच्या यादीत श्रीखंडाचाही समावेश करू शकता. प्रत्येकाला त्याची चव आवडेल. श्रीखंडाची चव फक्त मोठ्यांनाच आवडते असे नाही तर लहान मुलेही मोठ्या उत्साहाने खातात. ड्रायफ्रुट्स आणि वेलचीचा स्वाद श्रीखंडाची चव आणखीनच वाढते. जर तुम्ही आत्तापर्यंत श्रीखंड बनवले नसेल तर आमच्या नमूद केलेल्या पद्धतीच्या मदतीने ते अगदी सहज तयार करता येईल.

श्रीखंड बनवण्याचे साहित्य

दही - १ किलो

ट्रेंडिंग न्यूज

बदाम - १०

काजू - २०

पिस्ता - ५

वेलची पावडर - १ टीस्पून

केशर - १/२ टीस्पून

केशर फूड कलर - १ चिमूटभर (ऐच्छिक)

साखर - चवीनुसार

श्रीखंड कसे बनवायचे?

चविष्ट श्रीखंड बनवण्यासाठी आधी दही घ्या. श्रीखंड तयार करण्यासाठी दह्याचे सर्व पाणी काढून टाकणे आवश्यक आहे. यासाठी प्रथम गाळणीवर किंवा खोल तळाच्या भांड्यावर कापड पसरवा आणि नंतर वर दही टाका आणि कापड सर्व बाजूंनी झाकून टाका. यानंतर कापड पिळून घट्ट बांधून घ्या. असे केल्याने दह्याचे बरेचसे पाणी एकाच वेळी बाहेर पडेल. यानंतर, दह्याचे कापड उंच ठिकाणी लटकवा आणि ७-८ तासांसाठी सोडा. यामुळे दह्यात असलेले सर्व पाणी निघून जाईल. आता एका भांड्यात काढून टाकलेले दही ५ मिनिटे चांगले फेटून घ्या. आता त्यात केशर, वेलची पूड आणि चवीनुसार साखर घालून चांगले मिक्स करून पुन्हा फेटून घ्या.

श्रीखंडातील सर्व गुठळ्या निघून जाईपर्यंत ते फेटत राहा. यास सुमारे १५ मिनिटे लागू शकतात. आता श्रीखंडात चिरलेला ड्रायफ्रुट्स (काजू, पिस्ता, बदाम) घालून मिक्स करा. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही श्रीखंडात केशर फूड कलर घालू शकता. त्यामुळे श्रीखंडाचा रंग पांढर्‍याऐवजी भगवा पिवळा दिसू लागेल. चवीने भरलेले श्रीखंड तयार आहे. १ तास फ्रीजमध्ये ठेवा आणि नंतर सर्व्ह करण्यापूर्वी वर ड्राय फ्रूट्स सजवा.

 

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग