मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Masala Chaas Recipe: आता बाजारासारखा मसाला ताक घरीच बनवा, जाणून घ्या सोपी पद्धत!

Masala Chaas Recipe: आता बाजारासारखा मसाला ताक घरीच बनवा, जाणून घ्या सोपी पद्धत!

Tejashree Tanaji Gaikwad HT Marathi
Apr 18, 2024 05:40 PM IST

Masala Buttermilk Recipe: उन्हाळ्यात आवर्जून ताक प्यावे. रेगुलर प्लेन ताकापेक्षा तुम्ही मसाला ताक घरी बनवू शकता. जाणून घ्या रेसिपी.

how to make Masala Chaas know Recipe
how to make Masala Chaas know Recipe (freepik)

How to Make Masala Chaas: उन्हाळ्यात ताजे राहण्यासाठी फ्रेश फळ, फळांचे ज्यूस आणि अन्य पदार्थ खातात. लोक आवर्जून दही-आधारित पदार्थांचे अधिक सेवन करतात. दह्यापासून बनवलेल्या घरगुती पदार्थांमध्ये ताकाचाही समावेश होतो. खरंतर लोक बाजारातून ताक विकत घेऊन पितात. प्लेन ताकापेक्षा अनेकांना मसाला ताक आवडते. हे अजून महाग असते. पण हे ताक जर तुम्ही घरी बनवले तर तुमच्या खिशावर फारसा भार पडणार नाही आणि बाजारातील ताकासारखी चव तुम्हाला घरबसल्या मिळेल. मात्र, अनेकजण घरी ताक तयार करून पितात.पण त्यांची तक्रार एवढीच की त्यांनी ताक बनवले पण बाजारातील ताकासारखी चव मिळाली नाही. तुमचीही अशीच तक्रार असेल तर आम्ही या रेसिपीद्वारे तुमची तक्रार सोडवू शकतो. ही रेसिपी वापरून जर तुम्ही घरी ताक बनवले तर तुमच्या ताकाची चव तशीच लागेल जी तुम्ही बाजारात मिळते. चला जाणून घेऊयात रेसिपी.

ट्रेंडिंग न्यूज

लागणारे साहित्य

दही, भाजलेले जिरे, काळे मीठ, पाणी

Cold Coffee Recipe: मलईदार, फेसाळलेली कोल्ड कॉफी मशीनशिवाय घरीच बनवा, नोट करा रेसिपी!

जाणून घ्या कृती

> सगळ्यात आधी, तुम्हाला किती लोकांसाठी ताक बनवायचं आहे ते ठरवा. तितक्या प्रमाणात दही घ्या. जर तुम्ही एक ग्लास ताक बनवत असाल तर अर्धा ग्लास दही घ्या आणि तेवढेच पाणी लागेल.

> दही एका भांड्यात ठेवा आणि त्यात अर्ध्या ग्लासपेक्षा थोडे कमी पाणी घाला. यानंतर दही घोटून घ्या. जर तुमच्याकडे घोटण्यासाठी रवी किंवा मिक्सर नसेल तर तेही ठीक आहे.

> अर्धा ग्लास दही आणि अर्ध्या ग्लासपेक्षा थोडे कमी पाणी मिक्सरच्या भांड्यात घ्या. आता मिक्सर मध्ये मिश्रण फिरवून घ्या.

> यानंतर तुम्ही ग्लास घ्या. जेव्हा तुम्ही मिक्सरच्या भांड्यातून किंवा चर्नरमधून घोसाळंलेलं दही ग्लासमध्ये ओतता तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा.

> तुम्ही थोड्या अंतरावरून ताक ग्लासात ओता. याचे कारण असे की जर तुम्ही थोड्या अंतरावरून ग्लासमध्ये ताक ओतले तर त्यात फेस तयार होतो. हा फेस तर छान दिसेलच पण ताक प्यायल्यावर त्याची चवही छान लागेल.

> ताक ग्लासात टाकण्यापूर्वी त्यात चवीनुसार काळे मीठ टाकावे.

> आता भाजलेले जिरे बारीक वाटून घ्या. ही जिरेपूड ताकावर घाला.

> ताक अधिक आकर्षक बनवायचे असेल तर त्यावर दोन-तीन कोथिंबीर घाला. आता तुमचे ताक पिण्यासाठी तयार आहे.

WhatsApp channel