मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  काळ्या हरभऱ्यापासून बनवा टेस्टी कबाब, संध्याकाळच्या नाश्त्यासाठी आहे परफेक्ट

काळ्या हरभऱ्यापासून बनवा टेस्टी कबाब, संध्याकाळच्या नाश्त्यासाठी आहे परफेक्ट

Hiral Shriram Gawande HT Marathi
Feb 01, 2023 06:11 PM IST

Kebab With Kale Chane: काळे चणे हे प्रथिनांनी समृद्ध असतात, ज्याची चवही चांगली असते. लोकांना त्याची चाट आणि पराठे खायला आवडतात. काळ्या हरभऱ्यापासून कबाब बनवण्याची अप्रतिम रेसिपी येथे पहा.

काळ्या हरभऱ्याचे कबाब
काळ्या हरभऱ्याचे कबाब

Recipe of Kebab With Kale Chane: बहुतेक लोकांना सकाळच्या नाश्त्यात काळे हरभरे खायला आवडतात. त्याच्या मदतीने चाट बनवता येते, भाजी बनवता येते आणि काही लोक त्याचे पराठेही बनवतात. भरपूर प्रथिने असल्याने ते आरोग्यासाठी फायदेशीर असतात. काळ्या हरभऱ्यापासून कबाब कसे बनवायचे ते आम्ही येथे सांगत आहोत. ही डिश चवीला अतिशय टेस्टी आणि चटपटीत आहे. तुम्ही ते स्नॅकपासून स्टार्टरमध्ये सर्व्ह करू शकता.

काळ्या हरभऱ्यापासून कबाब बनवण्यासाठी तुम्हाला आवश्यक आहे....

- काळे हरभरे (भिजवलेले)

- पनीर

- बटाटे (उकडलेले)

- जिरे

- धनेपूड

- गरम मसाला

- आमचूर पावडर

- लाल तिखट

- मीठ

- चाट मसाला

- कोथिंबीर

- हिरवी मिरची

- आले

- तेल

कसे बनवावे

काळ्या हरभऱ्यापासून कबाब बनवण्यासाठी प्रथम भिजवलेले काळे हरभरे हलके उकळवा. नंतर ते पाण्यातून बाहेर काढून काही वेळ गाळणीत ठेवा. आता कढईत तेल गरम करून त्यात जिरे टाका. नंतर त्यात धने पूड, चिरलेले आले आणि चिरलेली हिरवी मिरची घालून परतून घ्या. त्यात हरभरा सोबत गरम मसाला, आमचूर पावडर, तिखट आणि मीठ घाला. नंतर पाणी घालून झाकण ठेवून शिजवा. शिजल्यानंतर गॅस बंद करा आणि हरभरा थंड होण्यासाठी राहू द्या. ते थंड झाल्यावर ते ब्लेंड करा. नंतर बारीक केलेल्या हरभऱ्यामध्ये किसलेले बटाटे आणि किसलेले पनीर घाला. चांगले मिक्स करा. आता त्यात हिरवी कोथिंबीर घालून मिक्स करा. या पेस्टपासून टिक्की बनवा आणि कबाब तयार करा. पॅनमध्ये तेल घालून कबाब एक एक करून सोनेरी होईपर्यंत तळा. कबाब तयार आहेत. हिरवी चटणी आणि कांद्यासोबत सर्व्ह करा.

 

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग