मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Bubble Tea: तुम्ही कधी प्यायलात बबल टी? ट्राय करा ही सोपी रेसिपी

Bubble Tea: तुम्ही कधी प्यायलात बबल टी? ट्राय करा ही सोपी रेसिपी

Hiral Shriram Gawande HT Marathi
Jan 30, 2023 05:56 PM IST

Bubble Tea Recipe: आजकाल बबल टी खूप प्रसिद्ध आहे. ते पिण्यासाठी लोक रेस्टॉरंटकडे वळतात. जर तुम्हाला या खास तैवानी चहाचा आस्वाद घ्यायचा असेल तर तुम्ही घरीही बनवू शकता. ते बनवण्याची रेसिपी ही आहे.

बबल टी
बबल टी (pexels)

How to make Bubble Tea or Boba Tea : आजकाल बबल टी खूप ट्रेंडमध्ये आहे. ज्याला आज गुगगुलने डूडल बनवून आणखी प्रसिद्ध केले आहे. कोविड १९ च्या काळात लोकांना हा चहा खूप आवडला होता. बबल टीला बोबा टी किंवा पर्ल मिल्क टी असेही म्हणतात. तैवानचा स्थानिक चहा आता जगप्रसिद्ध झाला आहे. जे भारतातील लोकांनाही प्यावेसे वाटते आणि ते रेस्टॉरंट्सकडे वळत आहेत. जिथे वेगवेगळ्या फ्लेवरचा बबल टी मिळतो. जर तुम्ही अजून त्याची चव चाखली नसेल तर तुम्ही या पद्धतीने घरी बबल टी तयार करू शकता. चला तर मग जाणून घेऊया कसा बनवायचा बबल टी.

ट्रेंडिंग न्यूज

बबल टी बनवण्यासाठी साहित्य

- १ कप टॅपिओका पर्ल्स

- १ चमचा चहपत्ती

- २ चमचे ब्राऊन शुगर

- तुम्हाला हवी असल्यास तुम्ही मध देखील घेऊ शकता

- २ कप दूध

- २ कप पाणी

- जर तुमच्याकडे टॅपिओका पर्ल्स नसेल तर साबुदाणा वापरा.

बबल टी किंवा बोबा टी बनवण्याची कृती

सर्वप्रथम एका पातेल्यात पाणी टाकून त्यात टॅपिओका बॉल्स उकळा. चांगले फुगले की गॅस बंद करा. आता दुसऱ्या पॅनमध्ये पाणी घालून चहापत्ती उकळा. उकळी आल्यावर चहा गाळून थंड होऊ द्या. मग हा चहा फ्रीजमध्ये ठेवा. टॅपिओका बॉल्स थंड पाण्याखाली धुवा आणि हळूवारपणे पिळून घ्या. पण लक्षात ठेवा की ते अजिबात मॅश केलेले नसावे आणि पॅनला चिकटू नये. हे बॉल्स एका बाउलमध्ये काढा. त्यावर ब्राऊन शुगर किंवा मध घालून मिक्स करा. गोडपणा वाढवण्यासाठी ब्राऊन शुगर सिरप बनवा. आता सर्व्हिंग ग्लासमध्ये टॅपिओका बॉल्स आणि शुगर सीरप घाला. चहा टाका आणि थंड दूध घालून मिक्स करा. टेस्टी बबल टी तयार आहे.

 

WhatsApp channel

संबंधित बातम्या