मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  डिनरमध्ये बनवा भरलेली दुधीची भाजी, मुलही खातील आवडीने

डिनरमध्ये बनवा भरलेली दुधीची भाजी, मुलही खातील आवडीने

Hiral Shriram Gawande HT Marathi
Feb 01, 2023 08:55 PM IST

Bharwa Lauki Recipe: अनेकदा घरातील मुलांसोबत मोठे देखील दुधी भोपळ्याची भाजी खायचा कंटाळा करतात. तुमच्या घरी देखील असे चित्र असेल तर तुम्ही ही भाजी करुन पहा. भरलेली वांगी आणि कारले खायला विसराल.

भरलेली दुधीची भाजी
भरलेली दुधीची भाजी (Pinterest)

Stuffed Bottle Gourd Recipe: दुधी भोपळाची भाजी खाण्याच्या म्हटले की मुलं आणि मोठं दोघं पण नाक मुरडतात. अशा स्थितीत तुम्ही भरलेली दुधीची भाजी बनवू शकता. हे स्वादिष्ट देखील असेल आणि प्रत्येकजण पौष्टिकतेने परिपूर्ण दुधी सहजपणे खाईल. प्रत्येक घराघरात रोजच्या जेवणात काहीतरी वेगळे आणि चविष्ट पदार्थाला मागणी असते. परंतु आवश्यक भाज्या खाल्ल्याशिवाय पोषण अपूर्ण राहू शकते. भाज्यांना थोडा वेगळा ट्विस्ट देऊन तुम्ही सहज मुलांना खायला देऊ शकता. चला तर मग जाणून घेऊया स्टफ्ड दुधी भोपळ्याची भाजी कशी बनवायची.

ट्रेंडिंग न्यूज

भरलेली दुधीची भाजी बनवण्यासाठी साहित्य

- दुधी भोपळा १

- कांदा २

- टोमॅटो २

- आले-लसूण पेस्ट १ टीस्पून

- हरभरा डाळ अर्धी वाटी

- मोहरी १ टीस्पून

- हळद १ टीस्पून

- लाल तिखट

- धने पावडर

- बडीशेप पावडर

- आमचूर पावडर

- गरम मसाला

- मीठ

- तेल

भरलेली दुधीची भाजी बनवण्याची पद्धत

भरलेली दुधी भोपळ्याची भाजी बनवण्यासाठी प्रथम दुधी सोलून घ्या. नंतर त्याचे दीड इंच लांब तुकडे करावेत. टोमॅटो कापून ग्राइंडरमध्ये बारीक करून पेस्ट बनवा. कांद्याची पेस्ट करून तयार करा. हरभरा डाळ भिजवून बारीक वाटून घ्या. कढईत तेल गरम करून मोहरी तडतडून घ्या. मोहरी तडतडल्यावर त्यात कांद्याची पेस्ट आणि टोमॅटोची पेस्ट घालून भाजून घ्या. चांगले भाजल्यानंतर त्यात लसूण-आले पेस्ट घाला. पाच मिनिटे परतून झाल्यावर त्यात हरभरा पेस्ट घालून ढवळावे. या पेस्टमध्ये हळद, मीठ, लाल मिरची, धने पावडर, बडीशेप पावडर घाला. सर्व काही मिक्स करा आणि मीठ घाला. मसालातून तेल सुटल्यावर गॅस बंद करा.

अशा प्रकारे भरा दुधी

कट केलेल्या दुधीमधून कट करुन त्यात हा मसाला भरा आणि त्याला धाग्याने बांधा. आता एका कढईत तेल गरम करा आणि हळूहळू सर्व दुधीचे तुकडे तेलात टाका. झाकण ठेवून मंद आचेवर दहा मिनिटे शिजू द्या. नीट शिजल्यावर आणि मऊ झाल्यावर गॅस बंद करा. गरमागरम पोळी किंवा पराठ्यासोबत सर्व्ह करा.

 

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग