मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Home Remedy: केसांना स्ट्रेट करण्यासाठी स्ट्रेटनिंग नाही तर ट्राय करा तांदूळाची ही देसी रेमेडी
केस स्ट्रेट करण्यासाठी घरगुती उपाय
केस स्ट्रेट करण्यासाठी घरगुती उपाय (unsplash)

Home Remedy: केसांना स्ट्रेट करण्यासाठी स्ट्रेटनिंग नाही तर ट्राय करा तांदूळाची ही देसी रेमेडी

24 January 2023, 20:30 ISTHiral Shriram Gawande

Hair Straightening: स्ट्रेट केस सगळ्या मुलींना आवडतात. पार्लर मध्ये हेअर स्ट्रेटनिंग करण्यापेक्षा तुम्ही घरच्या घरी तांदळाने ते करु शकता. कसे ते जाणून घ्या.

Home Remedies to Straighten Hair With Rice Flour: स्त्रिया अनेकदा फ्रिजी आणि कुरळ्या केसांपासून मुक्त होण्यासाठी केस स्ट्रेट करतात. पण केस स्ट्रेट करण्याचा हा बोरिंग आणि कंटाळवाणा मार्ग आहे. दुसरीकडे काही मुली हा त्रास टाळण्यासाठी पार्लरमध्ये जाऊन हेअर स्ट्रेटनिंग ट्रिटमेंट करून घेतात, ज्यामुळे त्यांना हजारो रुपये तर खर्च होतातच पण केसांचेही नुकसान होते. जर तुम्हालाही या समस्येचा सामना करावा लागत असेल तर घरी बसून तांदळाचा हा घरगुती उपाय करून तुम्ही स्ट्रेट आणि शाइनी केसांचे स्वप्न पूर्ण करू शकता. कसे ते जाणून घेऊया.

ट्रेंडिंग न्यूज

तांदळाच्या पिठाने केस स्ट्रेट करण्यासाठी देसी रेसिपी

साहित्य

- तांदूळ - १ वाटी

- एलोवेरा जेल - २ चमचे

- मुलतानी माती - २ चमचे

- ग्लिसरीन - १ चमचा

- खोबरेल तेल - ३-४ चमचे

केस स्ट्रेट करण्यासाठी करा ही पद्धत

केस स्ट्रेट करण्यासाठी आधी तांदूळ धुवून रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा. आता मिक्सरमध्ये बारीक करून कापडाच्या मदतीने पाणी गाळून घ्या. तांदळाचे पाणी गॅसवर चांगले शिजवून घ्या. पाणी घट्ट झाल्यावर त्यात खोबरेल तेल, ग्लिसरीन, मुलतानी माती आणि एलोवेरा जेल मिक्स करुन पेस्ट तयार करा. आता हा पॅक स्कॅल्प आणि केसांना लावा आणि साधारण १ तास राहू द्या. हे मिश्रण लावताना लक्षात ठेवा की केसांना वळण येऊ नये. ते सरळ रहावे. आता केस धुवा. हा घरगुती उपाय केल्याने केस सरळ आणि मजबूत होतील.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

 

विभाग