मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Health Tips : वाढलेल्या उन्हामुळं डोळ्यांना होतोय भयंकर त्रास; अशी घ्या काळजी

Health Tips : वाढलेल्या उन्हामुळं डोळ्यांना होतोय भयंकर त्रास; अशी घ्या काळजी

Atik Sikandar Shaikh HT Marathi
May 04, 2022 08:39 AM IST

उन्हाळ्यात वाढलेल्या अतिउष्णतेचा परिणाम हा फक्त शरिरावरच जाणवत नाही तर त्यामुळं डोळ्यांचंही आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता असते. त्यासाठी काय करायला हवं, वाचा...

Eyes Durning During Summer
Eyes Durning During Summer (HT)

Heat Wave : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रासह देशभरातील विविध शहरांमध्ये तापमानात प्रचंड वाढ झाल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यामुळं वाढलेल्या उष्णतेचा मोठा त्रास लोकांना होत आहे. त्यासाठी काहीजण बाहेर पडताना सनक्रिम किंवा डोळे आणि डोकं झाकून घेत आहे. परंतु या अतिउष्णतेचा सर्वात जास्त परिणाम हा डोळ्यांच्या आरोग्यावर होत आहे. कारण वाढत्या तापमानामुळे उन्हाळ्यात डोळ्यांना ऍलर्जी आणि इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. त्याचबरोबर वातावरणातील वाढलेल्या तापमानामुळं डोळे कोरडे होणे किंवा त्यासंदर्भातील संक्रमित रोग होण्याची शक्यता असते. अशावेळी डोळ्यांची योग्यवेळी आणि योग्यप्रकारे काळजी न घेतल्यास त्यामुळं डोळे खराब होऊन दृष्टी जाण्याचा धोका असतो. त्याचबरोबर या लक्षणांमध्ये ऍलर्जी, डोळ्यांमध्ये खाज सुटणे, लालसरपणा किंवा जळजळ होणे अशा समस्या जाणवण्याचीही शक्यता असते. त्यासाठी उन्हाळ्यात डोळ्यांची काळजी घेणं अत्यंत गरजेचं असतं. अन्यथा डोळ्यांच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. त्यासाठी उपाय म्हणून नेहमी डॉक्टराचा सल्ला घ्यायला हवा.

ट्रेंडिंग न्यूज

काय काळजी घ्याल?

डोळ्यांचं आरोग्य आणि त्याचं सौंदर्य वाढवण्यासाठी व्यक्तीनं किमान सात ते आठ तास शांत झोप घेणं गरजेचं असतं. त्यासाठी झोपेतली अनियमितता संपवायला हवी. त्यासह सध्याच्या वाढलेल्या उष्णतेच्या काळात व्यक्तीनं आवश्यकतेनुसार जास्तीत जास्त पाणी प्यायला हवं. ते शरिरासाठी आणि परिणामी डोळ्यांच्या आरोग्यासाठीही गुणकारी ठरत असतं. त्यामुळं दिवसातून आठ ते दहा ग्लास पाणी प्यायला हवं. त्यामुळं डोळे कोरडे होत नाही.

सकाळी किंवा संध्याकाळी चेहरा धुत असताना त्यावेळी डोळ्यांना थोडसं थंड पाण्यानं धुवायला हवं. त्यामुळं त्यातील उष्णता कमी होण्यास मदत होते. त्याचबरोबर ज्या लोकांना चष्मा लागलेला आहे त्या लोकांना बाहेर पडताना चष्मा घालायला हवा. त्यामुळं धुळ आणि प्रदुषणापासून डोळ्यांचं संरक्षण करणं सोपं होईल. त्याचबरोबर डोळ्यांच्या आरोग्यासाठी आहारात बदल करायला हवा. त्यासाठी हिरव्या पालेभाज्यांचं सेवन करणं हा चांगला पर्याय आहे.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel

संबंधित बातम्या