मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Cooking Tips: फ्राइड चिकन क्रिस्पी होत नाही? मदत करतील या सीक्रेट टिप्स

Cooking Tips: फ्राइड चिकन क्रिस्पी होत नाही? मदत करतील या सीक्रेट टिप्स

Hiral Shriram Gawande HT Marathi
Jan 27, 2023 08:51 PM IST

Crispy Fried Chicken: घरी चिकन तळताना अनेकदा त्यात तेल भरले जाते आणि ते क्रिस्पी होत नाही. तुमच्यासोबतही असे होत असेल तर या टिप्स फॉलो करा. बाजारासारखी चव आणि क्रिस्पी चिकन तयार होईल.

क्रिस्पी फ्राइड चिकन बनवण्यासाठी टिप्स
क्रिस्पी फ्राइड चिकन बनवण्यासाठी टिप्स

Secret Tips to Make Crispy Chicken at Home: लोकांना फ्राइड चिकन खूप आवडते. क्रिस्पी चिकन खायचे असल्यास लोक अनेकदा बाहेरून ऑर्डर करतात. अनेकदा घरीही चिकन बनवतात, पण त्याला बाजारासारखी चव लागत नाही किंवा चिकन कुरकुरीत होत नाही. काही वेळा चिकनमध्ये इतके तेल भरले जाते की चव पूर्णपणे बिघडते. तुमच्या चिकनसोबतही असेच काही घडत असेल तर तुम्ही या टिप्स फॉलो करू शकता. त्यामुळे चिकन क्रिस्पी होऊन चवीला बाजारासारखे लागते.

तांदळाच्या पीठाचा वापर

चिकन बुडवण्यासाठी बॅटर तयार करत असाल तर त्यात तांदळाच्या पिठाचा वापर करा. ते बाइंड करण्यासाठी थोड्या प्रमाणात बेसन घ्या. यामुळे चिकन क्रिस्पी होईल. तुम्हाला हवे असल्यास तांदळाच्या पिठात गुंडाळून चिकन भाजू शकता.

तेलाच्या उष्णतेची काळजी घ्या

चिकन तळण्यासाठी योग्य तापमान असावे. जर तेल थंड असेल किंवा कमी तापमान असेल तर चिकन तेल शोषून घेईल. त्यामुळे चव खराब होते. चिकन तळताना तेलाचे तापमान मध्यम असावे म्हणजे चिकन आतून शिजते.

चिकनमध्ये मीठ घाला

चिकन तळताना तेलात मीठ घाला. ही खूप चांगली ट्रिक आहे. यामुळे चिकन कमी तेल शोषून घेते आणि चांगले तळले जाते.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

 

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग