मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  रोजच्या खाण्यापिण्यातील 'या' चुका ठरतात कॅन्सरचं कारण, तुम्ही तर करत नाही ना?

रोजच्या खाण्यापिण्यातील 'या' चुका ठरतात कॅन्सरचं कारण, तुम्ही तर करत नाही ना?

Hiral Shriram Gawande HT Marathi
Jan 26, 2023 06:49 PM IST

Health Care: आपल्या स्वयंपाकघरात खाण्यापिण्याशी संबंधित अशा अनेक गोष्टी आहेत, ज्याकडे आपण अजिबात लक्ष देत नाही. पण या गोष्टी रोगांचे माहेरघर असतात आणि शरीरावर कर्करोगाचे कारण बनतात.

किचन मधील या चुकांमुळे होऊ शकतो कॅन्सर
किचन मधील या चुकांमुळे होऊ शकतो कॅन्सर

Cancer Causing Kitchen Appliances: दैनंदिन खाण्यापासून ते दिनचर्येपर्यंत, आपल्या आरोग्यावर दीर्घकाळ परिणाम दिसून येतो. जर आपण अन्नाच्या बाबतीत योग्य पद्धतीचा अवलंब केला नाही तर निरोगी अन्न देखील फायद्याऐवजी नुकसान करू लागते. अनहेल्दी इटिंग हॅबिट, खाण्यापिण्याचे चुकीचे कॉम्बिनेशन आणि चुकीची वेळ यामुळे मधुमेह, हाय कोलेस्ट्रॉल, लठ्ठपणा यांसारखे आजार होतात. काही वेळा छोट्या-छोट्या समस्यांकडे दुर्लक्ष करून ते कॅन्सरचे कारण बनतात. जर तुम्ही स्वयंपाकघरात अशा प्रकारची चूक केली तर दीर्घकाळात ते कर्करोगास जन्म देऊ शकते.

ओव्हनमध्ये अन्न गरम करणे

अनेकदा लोक ओव्हनमध्ये प्लास्टिकच्या कंटेनरमध्ये अन्न गरम करतात. ओव्हनमध्ये अन्न गरम केल्याने प्लास्टिकमधून एंडोक्राइन नावाचे घातक रसायन बाहेर पडते. जे अन्नासोबत विरघळते आणि शरीरात जाते. त्यामुळे आरोग्यावर वाईट परिणाम होतो आणि कर्करोगाचा धोकाही वाढतो.

प्लास्टिकच्या भांड्यांमध्ये खाणे

प्लास्टिकचे रंगीबेरंगी आणि सुंदर भांडी आजकाल प्रत्येक घरातील किचनचा भाग झाले आहेत. रात्रीच्या जेवणाच्या ताटापासून ते टिफिन आणि कॉफी मगपर्यंत लोक प्लास्टिकच्या खरेदीला प्राधान्य देत आहेत. प्लास्टिकची बनलेली ही भांडी आरोग्यासाठी घातक आहेत. त्यात गरम अन्न किंवा पेये टाकल्याने हानिकारक रसायने त्यात विरघळू लागतात आणि आरोग्यास हानी पोहोचवतात.

नॉनस्टिक मध्ये जळलेले अन्न

आजकाल लोक सोयीसाठी नॉनस्टिक भांड्यांमध्ये अन्न शिजवतात. ज्यामध्ये अन्न जळले तर ते अजिबात खाऊ नये. जळलेल्या अन्नामध्ये एक्रिलामाइड नावाचे रसायन तयार होते, जे अन्नात मिसळते आणि पोटात पोहोचते. या रसायनामुळे कर्करोग होतो. म्हणूनच जळलेले अन्न कधीही खाऊ नये.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

 

WhatsApp channel

संबंधित बातम्या