मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Dry Skin: कोरड्या त्वचेची समस्या? या नॅचरल गोष्टी लावायला विसरु नका!

Dry Skin: कोरड्या त्वचेची समस्या? या नॅचरल गोष्टी लावायला विसरु नका!

Hiral Shriram Gawande HT Marathi
Jan 23, 2023 12:41 PM IST

Winter Skin Care Tips: थंडीच्या दिवसात बऱ्याच लोकांची त्वचा इतकी कोरडी दिसू लागते की त्यांची त्वचा सोलायला लागते. चेहऱ्यावरील कोरडेपणा तुम्ही या काही नॅचरल गोष्टींनी झटपट दूर करु शकता.

कोरड्या त्वचेपासून सुटका मिळवण्यासाठी नॅचरल गोष्टी लावा
कोरड्या त्वचेपासून सुटका मिळवण्यासाठी नॅचरल गोष्टी लावा

Natural Remedies To Treat Peeled Dry Skin: थंडीच्या मोसमात बाहेरून आल्यावर त्वचा खूप निस्तेज दिसू लागते. अनेकांची त्वचा इतकी कोरडी होते की ती सोलायला लागते. जर तुम्ही कोरड्या त्वचेवर उपचार केले नाही तर त्यामुळे त्वचेच्या अनेक समस्या तर उद्भवतातच शिवाय चेहऱ्यावर पिंपल्स देखील होतात. अशा परिस्थितीत तुम्ही चेहऱ्यावरील कोरडेपणा झटपट दूर करणे खूप गरजेचे आहे. चला जाणून घ्या काही टिप्स.

साय किंवा फ्रेश क्रीम

जर तुमची त्वचा खूप कोरडी झाली असेल तर तुम्ही त्यासाठी फ्रेश क्रीम म्हणजेच दुधाची साय वापरू शकता. सायने चेहऱ्याला मसाज करा आणि नंतर फेस वॉशने धुवा आणि थोडी मॉइश्चरायझिंग क्रीम लावा. यामुळे तुमची त्वचा खूप निरोगी दिसेल.

एलोवेरा जेल

एलोवेरा जेल प्रत्येक प्रकारच्या त्वचेसाठी वरदानापेक्षा कमी नाही. म्हणून एलोवेरा जेल घ्या आणि चेहऱ्यावर मसाज करा. जर तुम्ही ताज्या कोरफडीचे पान घेऊन चेहऱ्यावर लावले तर तुमचा चेहरा खूप चमकदार दिसेल आणि कोरडेपणाही दूर होईल.

मध

कोरडेपणा कमी करण्यासाठी मध देखील खूप प्रभावी आहे. मधात थोडे गुलाब पाणी मिसळून चेहऱ्यावर लावू शकता. यामुळे चेहऱ्यावरील अतिरिक्त कोरडेपणा दूर होतो. मध लावल्यानंतर चेहरा धुवा.

ग्लिसरीन

कोरड्या त्वचेसाठी ग्लिसरीन देखील चांगला पर्याय आहे. चेहरा धुतल्यानंतर तुम्ही ग्लिसरीन आणि गुलाब पाणी लावू शकता. यामुळे तुम्हाला दिसेल की काही वेळातच तुमची त्वचा निरोगी दिसू लागली आहे.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

 

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग