अभिनेत्री-मॉडेल उर्फी जावेद तिच्या कपड्यांमुळे आता अनेकांच्या निशाण्यावर आली आहे. मात्र, उर्फी प्रत्येकालाच आपल्या हटके अंदाजात उत्तर देत आहे. उर्फीने आपल्या हटके स्टाईलने सगळ्यांचीच बोलती बंद केली आहे. आता उर्फीच्या आयुष्यात कोणाची तरी एण्ट्री झाल्याचे समोर आले आहे.
उर्फी ही तिच्या हटके फॅशनचे फोटो आणि व्हिडीओ सतत शेअर करताना दिसते. तिचे हे व्हिडीओ सर्वांचे लक्ष वेधून घेत असतात. सध्या सोशल मीडियावर उर्फीची एक वेगळी पोस्ट चर्चेत आहे. या पोस्टवरुन तिचा बॉयफ्रेंड असल्याचे म्हटले जात आहे.
वाचा: आर्चीसोबतच्या व्हायरल फोटोंवर परश्यानं सोडलं मौन; आकाश ठोसर म्हणाला...
उर्फीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोवर 'तो हो म्हणाला' असे लिहिले आहे. यावरुन उर्फील बॉयफ्रेंड भेटला असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. पण तो मुलगा कोण आहे याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. एका यूजरने उर्फीच्या या पोस्टवर कमेंट करत, 'उर्फी तुझे अभिनंदन' असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका यूजरने 'असा खजाना कोण सोडणार' असे म्हटले आहे. तिसऱ्या एका यूजरने 'कोण आहे तो भाग्यवान मुलगा' अशी कमेंट केली आहे.
उर्फी जावेद बर्याचदा असे आऊटफिट परिधान करते की, ज्यामुळे ती चर्चेत येते. मात्र, यावेळी उर्फीच्या सोशल मीडिया पोस्टने सर्वांचे लक्ष वेधले आहे. तिच्या आयुष्यात कोणाची एण्ट्री झाली हे अद्याप समोर आलेले नाही.
संबंधित बातम्या