मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Bhalchandra Kulkarni: ‘थरथराट’ फेम अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांचे निधन; ८८व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Bhalchandra Kulkarni
Bhalchandra Kulkarni

Bhalchandra Kulkarni: ‘थरथराट’ फेम अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांचे निधन; ८८व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

18 March 2023, 9:49 ISTHarshada Bhirvandekar

Bhalchandra Kulkarni Passes Away: आपल्या दमदार अभिनयाने मराठी मनोरंजनविश्व गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांचे निधन झाले आहे.

Bhalchandra Kulkarni Passes Away: आपल्या दमदार अभिनयाने मराठी मनोरंजनविश्व गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांचे निधन झाले आहे. अल्पशा आजाराने त्यांनी आज (१८ मार्च) वयाच्या ८८व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. ३००हून अधिक चित्रपटांत त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमठवला होता. भालचंद्र कुलकर्णी यांनी अनेक सहाय्यक भूमिका साकारत अमिट छाप सोडली होती. सकाळी साडेअकरा वाजता कोल्हापूरमधील कळंबा शिवप्रभू नगर येथील त्यांच्या निवासस्थानापासून अंत्ययात्रेस सुरुवात होणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

भालचंद्र कुलकर्णी गेले पाच दशकं मनोरंजन विश्वात सक्रिय होते. पाच दशकांच्या या बहारदार कारकिर्दीत त्यांनी अनेक सुपरहिट मराठी चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका केल्या. ‘पिंजरा’, ‘मुंबईचा जावई’, ‘थरथराट’, ‘खतरनाक’, ‘सोंगाड्या’, ‘नवरा नको गं बाई’, ‘हळद रुसली कुंकू हसलं’, ‘जावयाची जात’ अशा अनेक चित्रपटातून भालचंद्र कुलकर्णी यांनी संस्मरणीय भूमिका साकारल्या. त्यांनी मोठ्या पडद्यावर साकारलेल्या सहाय्यक भूमिकांसाठी ते नेहमीच लक्षात राहिले. प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून ते अभिनय क्षेत्रापासून काहीसे दूर होते.

अभिनेते भालचंद्र कुलकर्णी हे अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे संचालक देखील होते. चित्रपट महामंडळाने काही दिवसांपूर्वीच त्यांना चित्रभूषण पुरस्कार देऊन सन्मानित केले होते. याशिवाय त्यांना ज’नकवी पी. सावळाराम’ या पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले होते. काही महिन्यांपूर्वी त्यांना ब्रँड कोल्हापूर जीवनगौरव पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आला. त्यावेळी अनेक वर्षांच्या ब्रेकनंतर ते प्रेक्षकांच्या समोर आले होते. मात्र, हा पुरस्कार त्यांच्या आयुष्यातील अखेरचा पुरस्कार ठरला.

विभाग