मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Kartik Aaryan: लाईव्ह परफॉर्मन्स दरम्यान कार्तिक आर्यन जखमी; पायाला झाली दुखापत
Kartik Aaryan
Kartik Aaryan

Kartik Aaryan: लाईव्ह परफॉर्मन्स दरम्यान कार्तिक आर्यन जखमी; पायाला झाली दुखापत

18 March 2023, 8:45 ISTHarshada Bhirvandekar

Kartik Aaryan injured: एका कार्यक्रमात लाईव्ह परफॉर्मन्स दरम्यान कार्तिक आर्यनच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे.

Kartik Aaryan injured: बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनने आपल्या दमदार अभिनयाने लोकांवर अधिराज्य गाजवले आहे. कमी कालावधीतच त्याने बॉलिवूड इंडस्ट्रीत मोठी झेप घेतली आहे. सध्या अभिनेता कार्तिक आर्यनच्या हातात अनेक बिग बजेट चित्रपट आहेत. दरम्यान, कार्तिक आर्यनच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. नुकत्याच झालेल्या एका लाईव्ह परफॉर्मन्सदरम्यान कार्तिक आर्यनचा अपघात झाला असून, त्याला गंभीर दुखापत झाल्याचे सांगितले जात आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मीडिया रिपोर्ट्सनुसार एका कार्यक्रमात लाईव्ह परफॉर्मन्स दरम्यान कार्तिक आर्यनच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याचे सांगितले जात आहे. मात्र, या लाईव्ह परफॉर्मन्स पूर्ण होईपर्यंत कार्तिक आर्यनने आपली दुखापत बराच काळ लपवून ठेवली होती. या लाईव्ह परफॉर्मन्समध्ये कार्तिक आर्यन त्याच्या 'भूल भुलैया २'ची सिग्नेचर स्टेप करत होता. यादरम्यान त्याच्या पायाच्या घोटा मुरगळला आणि पाय हवेत अडकला. त्याच्या घोट्याला इतकी दुखापत झाली आहे की, तो परत स्टेजवर आपला पाय टेकवू शकला नाही. आधी लोकांना वाटले की, कार्तिक आर्यन मस्करी करतोय. पण, जेव्हा त्यांनी कार्तिकची अवस्था पाहिली तेव्हा सगळे घाबरले होते.

वैद्यकीय मदत येईपर्यंत कार्तिक आर्यन २० ते ३० मिनिटे स्टेजवर थांबला होता. वैद्यकीय पथक आणि फिजिओथेरपिस्टने त्याच्या पायाची तपासणी केली आणि त्याला प्राथमिक उपचार दिले. यानंतर डॉक्टरांच्या मदतीने कार्तिक आर्यनचा पाय जमिनीवर टेकवून ठेवण्यात आला. मात्र, अभिनेत्याची दुखापत पाहून काही वेळासाठी सगळेच घाबरले होते.

कार्तिक आर्यन लवकरच अनेक चित्रपटांमध्ये दिसणार आहे. ‘कॅप्टन इंडिया’, ‘सत्यप्रेम की कथा’, ‘लुका छुप्पी २’ आणि दिग्दर्शक कबीर खानसोबतच्या आगामी चित्रपटात देखील कार्तिक झळकणार आहे.

विभाग