मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  'वेड'चं खूळ जाईना! लवकरच चित्रपट गाठू शकतो १०० कोटींचा टप्पा! पाहा कलेक्शन...

'वेड'चं खूळ जाईना! लवकरच चित्रपट गाठू शकतो १०० कोटींचा टप्पा! पाहा कलेक्शन...

Harshada Bhirvandekar HT Marathi
Jan 31, 2023 11:24 AM IST

Ved Box Office Collection : रितेश देशमुख आणि जिनिलीया डिसुजा यांचा ‘वेड’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालत आहे.

Ved
Ved

Ved Box Office Collection : नव्या वर्षात अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर अनेक चित्रपटांनी चांगलाच धुमाकूळ घातला आहे. ‘वेड’, ‘वाळवी’, ‘बांबू’ या मराठी चित्रपटांसह ‘पठाण’, ‘गांधी गोडसे एक युद्ध’ सारखे हिंदी चित्रपट देखील बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहेत. सगळ्याच चित्रपटांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. एकीकडे हिंदी चित्रपट मराठी चित्रपटांची गळचेपी करत आहेत अशी ओरड असताना, दुसरीकडे मात्र वेगळंच चित्र दिसत आहे.

रितेश देशमुख आणि जिनिलीया डिसुजा यांचा ‘वेड’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाचे आतापर्यंतचे कमाईचे आकडे समोर आले आहेत. सध्या या चित्रपटाचा कलेक्शनचा आकडा पाहता हा चित्रपट लवकरच १०० कोटींचा टप्पा गाठू शकतो असा अंदाज वर्तवला जात आहे. आतापर्यंत या चित्रपटाने देशभरात ७० कोटींचा टप्पा पार केला आहे.

चित्रपटाने केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर, बाहेरील राज्यात देखील प्रेक्षकांचे भरपूर प्रेम मिळवले आहे. बॉक्स ऑफिसवर देखील या चित्रपटाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाच्या रिलीजनंतर सत्या आणि श्रावणी यांच्यात पुढे काय झालं हे जाणून घेण्याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली होती. प्रेक्षकांची ही उत्सुकता पाहून मेकर्सनी देखील या चित्रपटात सत्या श्रावणीचे गाणे सामील केले आहे.

नव्या गाण्यातून निर्मात्यांनी सत्या आणि श्रावणी यांची प्रेमकहाणी सांगून प्रेक्षकांची उत्सुकता आणखीन वाढवली आहे. यामुळे आता प्रेक्षक देखील पुन्हा या चित्रपटाकडे वाळू लागले आहे. याचाच फायदा चित्रपटाच्या कलेक्शनला मिळत आहे. आतापर्यंत या चित्रपटाने ७० कोटींची कमाई केली असून, आता हा चित्रपट लवकरच १०० कोटींचा टप्पा गाठू शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

IPL_Entry_Point