मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Pathaan: ‘पठाण’चं घवघवीत यश पाहून भारावली दीपिका पदुकोण; अभिनेत्रीला स्टेजवरच कोसळलं रडू!

Pathaan: ‘पठाण’चं घवघवीत यश पाहून भारावली दीपिका पदुकोण; अभिनेत्रीला स्टेजवरच कोसळलं रडू!

Harshada Bhirvandekar HT Marathi
Jan 31, 2023 09:04 AM IST

Pathaan Success : ‘पठाण’ या चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर या चित्रपटाच्या टीमने माध्यमांची भेट घेतली. यावेळी चित्रपटातील सगळ्याच कलाकारांनी आपल्या मनातील भावनांना वाट मोकळी करून दिली.

Deepika Padukone
Deepika Padukone

Pathaan Success : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान, जॉन अब्राहम आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण यांच्या ‘पठाण’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर घवघवीत यश मिळावले आहे. या चित्रपटाने चाहत्यांची मने जिंकली आहेत. एकीकडे ‘पठाण’ धुमाकूळ घालत असतानाच, दुसरीकडे ‘पठाण’च्या टीमच्यावतीने एक पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी शाहरुख खान, जॉन अब्राहम आणि दीपिका पदुकोण यांनी हजेरी लावली होती. यावेळी प्रेक्षकांचा चित्रपटाला मिळालेला प्रतिसाद पाहून दीपिका पदुकोण भारावून गेली होती. तिच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले होते.

‘पठाण’ या चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर या चित्रपटाच्या टीमने माध्यमांची भेट घेतली. यावेळी चित्रपटातील सगळ्याच कलाकारांनी आपल्या मनातील भावनांना वाट मोकळी करून दिली. या चित्रपटाच्या निमित्ताने दीपिका आणि शाहरुख खान यांची जोडी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहायला मिळाली. या आधी देखील शाहरुख खान आणि दीपिका यांनी एकत्र चित्रपट केले आहेत. या चित्रपटांच्या आठवणी शेअर करताना दीपिका भावूक झाली आणि तिला स्टेजवरच रडू कोसळलं.

या पत्रकार परिषदेत दीपिका पदुकोणच्या नावाचा गाजावाजा होत होता. स्वतःच्या नावाचा बोलबाला ऐकताच दीपिका भावूक झाली. चाहत्यांकडून मिळत असलेले प्रेम आणि पाठिंबा पाहून खूप छान वाटत असल्याचे दीपिका यावेळी म्हणाली. शाहरुख खान आणि दीपिकाने २००७मध्ये 'ओम शांती ओम' या चित्रपटात पहिल्यांदा एकत्र काम केले होते आणि तेव्हापासून त्यांच्यामध्ये खूप चांगले बाँडिंग निर्माण झाले आहे, जे या पत्रकार परिषदेतही पाहायला मिळाले.

‘पठाण’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. शाहरुखचा हा चित्रपट दर दिवशी तब्बल १०० कोटींची कमाई करत आहे. ‘पठाण’ चित्रपटातून शाहरुखने प्रेक्षकांची वाहवा मिळवली आहे. तर, अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या ग्लॅमरस स्टाईलनेही धुमाकूळ घातला आहे. जॉन अब्राहम देखील खलनायकाच्या भूमिकेत हिट ठरल्याचे सिद्ध झाले आहे. त्याचबरोबर सलमान खानच्या कॅमिओनेही या चित्रपटाची रंगत वाढवली आहे.

IPL_Entry_Point