मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Vanita Kharat: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम वनिता खरातचं बोल्ड प्रिवेडिंग फोटोशूट चर्चेत

Vanita Kharat: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम वनिता खरातचं बोल्ड प्रिवेडिंग फोटोशूट चर्चेत

Aarti Vilas Borade HT Marathi
Jan 24, 2023 03:07 PM IST

Vanita Kharat : वनिताचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत.

वनिता खरात
वनिता खरात (HT)

सोनी मराठी वाहिनीवरील 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाने अक्षरश: प्रेक्षकांना वेड लावले आहे. या कार्यक्रमातील सर्वच कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या कार्यक्रमात काम करणारी वनिता खरात लवकरच लग्नबंधात अडकणार आहे. त्यापूर्वी तिने केलेले प्रिवेडिंग फोटोशूट चर्चेत आहे.

काही दिवसांपूर्वी वनिताने बॉयफ्रेंडच्या वाढदिवशी प्रेमाची कबूली दिली होती. तिच्या बॉयफ्रेंडचे नाव सुमित लोंढे असे आहे. त्या दोघांनी दिवाळी हा सण एकत्र साजरा केला होता. आता ते लवकरच लग्न बंधनात अडकणार आहेत. त्यापूर्वी त्यांनी केलेल्या प्रिवेडींग फोटोशूटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
वाचा: नवरी नटली! अथिया- केएल राहूलचा लग्नातील पहिला फोटो आला समोर

वनिताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती लिप किस करताना दिसत आहे. दरम्यान त्यांच्या अंगावर पाणी फेकले जात असल्याचे दिसत आहे. त्यांच्या या बोल्ड फोटोने सर्वांचे लक्ष वेधले आहे. हा फोटो शेअर करत वनिताने 'गुपित मौनांचे नजरेस कळावे, ओठांचे मग चुंबन व्हावे।' असे कॅप्शन दिले आहे. अभिनेत्री स्पृहा वरद, नम्रता संभेराव, स्नेहल शिदम या कलाकारांनी यावर हार्ट इमोजी शेअर करत कमेंट केल्या आहेत. तर अनेक नेटकऱ्यांनी वनिता आणि सुमितला त्यांच्या लग्नासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

IPL_Entry_Point