मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Tu Tevha Tashi: माई मावशीचा विरोध पत्कारून सुरू होणार सौरभ-अनामिकाचा ‘लिव्हइन’ संसार!

Tu Tevha Tashi: माई मावशीचा विरोध पत्कारून सुरू होणार सौरभ-अनामिकाचा ‘लिव्हइन’ संसार!

Harshada Bhirvandekar HT Marathi
Nov 16, 2022 01:03 PM IST

Tu Tevha Tashi: सौरभ आणि अनामिका यांच्यातील नातं आता आणखी एक पाऊल पुढे सरकणार आहे. दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, आता त्यांच्या या निर्णयात बदल झाला आहे.

Tu Tevha tashi
Tu Tevha tashi

Tu Tevha Tashi: ‘तू तेव्हा तशी’ या मालिकेतून ‘चॉकलेट बॉय’ अभिनेता स्वप्नील जोशी (Swapnil Joshi) याने अनेक वर्षांनंतर छोट्या पडद्यावर एन्ट्री घेतली आहे. त्याच्या या मालिकेने देखील अल्पावधीत लोकप्रियता मिळवली आहे. स्वप्नील जोशीची मालिका म्हटली की, त्यातून एक नवा ट्रेंड नक्कीच सेट होतो. ‘तू तेव्हा तशी’ या मालिकेचं कथानक आता ‘लिव्हइन रिलेशनशिप’ या संकल्पनेभोवती फिरतंय. मालिकेच्या कथानकात आता एक नवं वळणं पाहायला मिळत आहे.

सौरभ आणि अनामिका यांच्यातील नातं आता आणखी एक पाऊल पुढे सरकणार आहे. दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, आता त्यांच्या या निर्णयात बदल झाला असून, त्या दोघांनीही लिव्हइनमध्ये राहण्याचा निर्णय घेतला आहे. आता त्यांच्या या निर्णयाला देखील त्यांनी मूर्त रूप दिले आहे.

माई मावशीचा विरोध लावणार झुगारून!

कॉलेजमध्ये राहून गेलेलं प्रेम पुन्हा एकदा आयुष्यात आपल्यावर, ते परत आपल्यापासून दूर जाऊ नये म्हणून सौरभ आणि अनामिका दोघेही प्रचंड प्रयत्न करत आहेत. कॉलेजमध्ये असताना अव्यक्त राहिलेलं प्रेम आपल्याला आयुष्यात पुन्हा कधीतरी नक्की मिळेल, या आशेवर जगणारा सौरभ पटवर्धन आणि त्याच्या प्रेमाची कल्पनाही नसणारी अनामिका यांची कथा आता खऱ्या अर्थाने पुढे सरकत आहे. सौरभने देखील यावेळेस आपल्या भावना व्यक्त करून, प्रेम परत मिळवलं आहे. मात्र, लग्न न करता एकमेकांची सोबत देण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. त्यांचा ‘लिव्हइन’ संसार मात्र सौरभच्या माई मावशीला मान्य नाही. पण, आता सौरभ आणि अनामिका त्यांच्या निर्णयावर ठाम आहेत.

नव्या घरात करणार प्रवेश

माई मावशीचा निर्णय अमान्य असल्याने सौरभने वाडा सोडण्याचा निर्णय घेतला. तर, अनामिकाने देखील सौरभची खंबीर साथ दिली. आता दोघांनी मिळून वेगळ्या घरात राहण्याचा निर्णय घेतला असून, दोघे आता त्यांच्या नव्या घरात प्रवेश करणार आहेत. या नव्या घरात त्यांचा लिव्हइन संसार सुरु होणार आहे. त्यामुळे मालिकेत आता अनेक नव्या घडामोडी आणि अनेक वळणं पाहायला मिळणार आहेत.

IPL_Entry_Point

विभाग