मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Hunter Trailer: अण्णा इज बॅक! सुनील शेट्टीच्या 'हंटर' सीरिजचा ट्रेलर पाहिलात का?

Hunter Trailer: अण्णा इज बॅक! सुनील शेट्टीच्या 'हंटर' सीरिजचा ट्रेलर पाहिलात का?

Aarti Vilas Borade HT Marathi
Mar 14, 2023 04:36 PM IST

Suniel Shetty: सुनील शेट्टी लवकरच हंटर या वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. या सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून चर्चेत आहे.

सुनील शेट्टी
सुनील शेट्टी

गेल्या काही दिवसांपासून सुनील शेट्टी त्याचा आगामी चित्रपट 'हेरा फेरी ३'साठी चर्चेत आहे. अशातच त्याची आगामी सीरिज 'हंटर'चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या सीरिजमध्ये सुनील शेट्टी एकदम हटके अंदाजात दिसणार आहे. ट्रेलरमधील त्याचा लूक पाहून चाहत्यांमध्ये सीरिजबाबत उत्सुकता पाहायला मिळते.

हंटर या सीरिजमध्ये सुनील शेट्टी एसीपी विक्रम सिंहची भूमिका साकारणार आहे. तो पैशांसाठी कोणत्याही हरवलेल्या व्यक्तीला शोधतो. या अॅक्शन थ्रिलर सीरिजमध्ये सुनील शेट्टीला काही अज्ञात लोक अपराधी लोकांच्या भागात घेऊन जातात. एका हरवलेल्या महिलेला शोधताना सुनील शेट्टी त्याच्या भूतकाळात रमतो. ट्रेलरची सुरुवात ही सुनील शेट्टी त्याच्या दोन मुलींसोबत खेळताना दाखवण्यात आली आहे. त्यानंतर सर्व काही बदलते.

हंटर सीरिजचा ट्रेलर शेअर करत सुनील शेट्टीने 'एसीपी विक्रमच्या दुनियेत तुमचे स्वागत आहे. माझ्या या जगात केवळ तोडण्याला परवानगी आहे, स्वत: तुटायला नाही. माझी नवीन सीरिज हंटर नक्की पाहा अॅमेझॉन मिनी टीव्हीवर' असे कॅप्शन दिले आहे.

सुनील शेट्टीसोबत या सीरिजमध्ये ईशा देओल, बरखा बिश्ट, राहुल देव, मिहिर आहूजा, टीना सिंह, चाहत तेजवानी, करणवीर शर्मा, सिद्धार्थ खेर, गार्गी सावंत आणि पवन चोप्रा महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. ही सीरिज २२ मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे.

IPL_Entry_Point