मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Subodh Bhave: नव्या वर्षात देणार नवी गुडन्यूज! सुबोध भावेंच्या ‘त्या’ पोस्टमुळे चाहतेही झाले आतुर

Subodh Bhave: नव्या वर्षात देणार नवी गुडन्यूज! सुबोध भावेंच्या ‘त्या’ पोस्टमुळे चाहतेही झाले आतुर

Harshada Bhirvandekar HT Marathi
Nov 14, 2022 09:37 AM IST

Subodh Bhave: अभिनेता सुबोध भावेंनी त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक खास पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी ‘कट्यार काळजात घुसली’ या चित्रपटाला ७ वर्षे पूर्ण झाल्याने प्रेक्षकांचे आभार मानले आहेत.

Subodh Bhave
Subodh Bhave

Subodh Bhave: ‘कट्यार काळजात घुसली’ (Katyar Kaljat Ghusali) या मराठी चित्रपटाला नुकतीच ७ वर्षे पूर्ण झाली. या चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटाने मराठी प्रेक्षकांच्या मनात हक्काची जागा निर्माण केली होती. या संगीतमय चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. आता या चित्रपटाला ७ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने अभिनेता सुबोध भावे यांनी एक खास पोस्ट केली आहे. या निमित्ताने अभिनेत्याने एक विशेष घोषणा देखील केली आहे, ज्यानंतर चाहते देखील आतुर झाले आहेत.

अभिनेता सुबोध भावेंनी त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक खास पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी ‘कट्यार काळजात घुसली’ या चित्रपटाला ७ वर्षे पूर्ण झाल्याने प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. यासोबतच त्यांनी एका नव्या प्रोजेक्टची घोषणा केली आहे. सुबोध भावेंचा हा नवा प्रोजेक्ट संगीत नाटकावर आधारित असल्याची चर्चा सध्या सुरु झाली आहे. आता या नव्या चित्रपटासाठी प्रेक्षक देखील आतुर झाले आहेत.

‘कट्यार काळजात घुसली’ या चित्रपटाचं एक पोस्टर शेअर करत सुबोध भावेंनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं की, ‘कट्यार काळजात घुसली’ १२ नोव्हेंबर २०१५...एका संगीतमय आनंददायी प्रवासाचे सातवे वर्ष. संगीत माणसं जोडतं आणि आनंद निर्माण करतं! अजून एक आनंददायी संगीतमय प्रवास पुढील वर्षी. तुम्हा सगळ्यांना मनापासून धन्यवाद’

चाहतेदेखील आतुर!

अभिनेता सुबोध भावे यांच्या या पोस्टवर चाहत्यांनी देखील भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका चाहतीने प्रतिक्रिया देत म्हणले की, ‘ही कट्यार खरोखर काळजात घुसणारी होती व राहील!’. आणखी एका चाहत्याने कमेंट करत म्हटले की, ‘सुरेल शास्त्रीय संगीतमय प्रवास जो मनाला सुखावून जातो आणि अंतर्मुख करतो नेहमीच..’ तर, आगामी नव्या चित्रपटाबद्दल सगळ्यांनीचा आपली उत्सुकता जाहीर केली आहे. आता आम्ही संगीत मानापमानची वाट पाहत असल्याचे प्रेक्षकांनी आणि चाहत्यांनी म्हटले आहे.

 

IPL_Entry_Point

विभाग