मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  सोनाली कुलकर्णीचा हनिमून व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
सोनाली कुलकर्णी
सोनाली कुलकर्णी (HT)
21 May 2022, 3:22 AM ISTAarti Vilas Borade
  • Share on Twitter
  • Share on FaceBook
21 May 2022, 3:22 AM IST
  • सोनालीचा मेक्सिकोमधील हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने गेल्या वर्षी ७ मे रोजी लग्न केले. काही दिवसांपूर्वी तिने लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा करत पुन्हा विधीवत लग्न केले. त्यानंतर सोनालीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत पतीसोबत दुसऱ्यांदा लग्न केल्याचे सांगितले होते. आता सोनालीच्या हनिमूनचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

सोनालीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर स्वत: हनिमूनचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. नुकत्याच शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये सोनाली मेक्सिकोमधील एका बिचवर असल्याचे दिसत आहे. दरम्यान, सोनालीने बिकिनी घातली आहे तर पतीने गुलाबी रंगाचा शर्ट. सोनालीने शेअर केलेला हा व्हिडीओ ड्रोनमधून शूट केला आहे. त्यामुळे व्हिडीओमध्ये निळाक्षार समुद्र, रिसोर्ट हे दिसत आहे.

हा व्हिडिओ शेअर करत सोनालीने ‘पॅराडाइज!’ असे कॅप्शन दिले आहे. सोबतच कॅप्शनमध्ये तिने व्हिडीओ शूट करणाऱ्यांचे @murph_holbox यांचे आभार मानले आहेत. तसेच आपल्या कॅप्शनमध्ये तिने हनिमून डायरीज असा हॅशटॅग वापरला आहे. सोनालीच्या या व्हिडीओवर अनेक कलाकार आणि चाहत्यांनी लाइक्स व कमेंटचा वर्षाव केला आहे.

गेल्या वर्षी ७ मे रोजी सोनालीने दुबईत कुणाल बेनोडकरशी पहिल्यांदा लग्न केले होते. लॉकडाऊनमुळे तिने रजिस्टर पद्धतीने लग्न केले होते. करोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे तिच्या लग्नाला मित्र परिवार, नातेवाई, कुटुंबीया यांना आमंत्रण नव्हते. पण आता सोनालीने पुन्हा लग्न केल्याचे समोर आले आहे.

  • Share on Twitter
  • Share on FaceBook