मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Balbharati: सिद्धार्थ जाधव- अभिजीत खांडकेकर पहिल्यांदाच एकत्र, 'बालभारती'चे पोस्ट प्रदर्शित

Balbharati: सिद्धार्थ जाधव- अभिजीत खांडकेकर पहिल्यांदाच एकत्र, 'बालभारती'चे पोस्ट प्रदर्शित

Aarti Vilas Borade HT Marathi
Sep 30, 2022 11:49 AM IST

Siddharth Jadhav: चित्रपटाचे पोस्टर पाहाता चाहत्यामध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता पाहायला मिळते. हा चित्रपट ११ नोव्हेंबर २०२२ रोजी रिलीज होणार आहे.

बालभारती
बालभारती (HT)

गेल्या काही दिवसांपासून मराठी चित्रपट हे बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करताना दिसत आहेत. यामधील एक चित्रपट म्हणजे 'दे धक्का २.' या चित्रपटातील अभिनेता सिद्धार्थ जाधवच्या अभिनयाने अनेकांची मने जिंकली. आता सिद्धार्थचा एक नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे नाव 'बालभारती' असे आहे. या चित्रपटाचे पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

सिद्धार्थ जाधवने चित्रपटाचे पोस्ट सोशल मीडियावर शेअर केले आहे. या पोस्टरमध्ये चित्रपटाचा खरा नायक आर्यन मेंघजी हा बालकलाकार आहे. त्याच्यासोबत मराठीतील आघाडीचे सिध्दार्थ जाधव, अभिजित खांडकेकर आणि नंदिता पाटकर हे कलाकार आहेत. आर्यन एक महान शास्त्रज्ञआईनस्टाईन च्या पोशाखात दिसतोय. आर्यनच्या वडिलांची भूमिका साकारणाऱ्या सिद्धार्थच्या हातात इंग्रजीतून मराठी शब्दकोश आहे, तर नंदिताने हेल्मेट घातले आहे ज्यावर टॉक इन इंग्लिश असे शब्द लिहिलेले आहेत. यावरून नक्कीच प्रेक्षकांना चित्रपटाच्या विषयाचा अंदाजयेईल. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच या विषयाची चर्चा आहे.
वाचा : मुक्ताला संबळ वाजवण्याची संधी रावसाहेब देतील का?

पालकांना त्यांच्या मुलांसाठी सर्वात जास्त काय हवे आहे. तर उत्तम शिक्षण.हीच कळकळ यात गुंफलेली आहे. बालभारती म्हणजे गमतीशीर कथा आणि मनाला भिडणारा संदेश यांची गुंफण. हा चित्रपट महाराष्ट्रीय संस्कृती आणि मराठी भाषेत रुजलेला आहे. तो मराठी भाषा, सर्जनशीलता आणि शोध यांना एकत्र आणतो तोही अगदी हलक्याफुलक्या पद्धतीने. योगायोगाने हा चित्रपट आजच्या ‘जय संशोधन’ या घोषणेशी सुसंगत आहे. जय जवान जय किसान जय विज्ञान आणि जय संशोधन ही नवीन घोषणा आहे.

बहुप्रतिक्षित मराठी चित्रपट बालभारतीचे पहिले पोस्टर आज प्रदर्शित झाले. स्फियरओरिजीन्स यांनी निर्मिती आणि नितीन नंदन यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. पोस्टरची पहिली झलकच चित्रपटाचे वगळेपण दाखवतो. बालभारतीमध्ये सिद्धार्थ जाधव, नंदिता पाटकर, उषा नाईक, आर्यन मेंघजी, रवींद्र मंकणी आणि खास भूमिकेत अभिजीत खांडकेकर आहेत. हा चित्रपट ११ नोव्हेंबर २०२२ रोजी रिलीज होणार आहे.

IPL_Entry_Point

विभाग