मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Dar Ughad Baye: मुक्ताला संबळ वाजवण्याची संधी रावसाहेब देतील का?

Dar Ughad Baye: मुक्ताला संबळ वाजवण्याची संधी रावसाहेब देतील का?

Aarti Vilas Borade HT Marathi
Sep 29, 2022 12:59 PM IST

स्त्रीने घरात संबळ वाजवू नये म्हणून रावसाहेब युवराजला दुसरा संबळ वादक शोधायला सांगतात

दार उघड बये
दार उघड बये (HT)

झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिकांच्या यादीमधील एक मालिका म्हणजे ‘दार उघड बये.' माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेच्या जागी ही मालिका सुरु झाली आहे. या मालिकेतील मुक्ता या पात्राने सर्वांची मने जिंकली आहेत. आता मालिकेत एक नवे वळण आले आहे. मुक्ताला संबळ वाजवल्यामुळे रावसाहेब घराबाहेर काढणार असे म्हटले जात आहे.

मुक्ता ही उत्तम संबळ वादक आहे. पण गावातले लोक एका स्त्रीने संबळ वाजवणे हे अपशकुन असते असे मानतात. मालिकेत येत्या काही भागांमध्ये आपण पाहिलं कि आत्माराम रावसाहेबांच्या वाड्यावर दर वर्षी देवीच्या आरतीला संबळ वाजवतात पण त्याला या वर्षी दमाचा त्रास निर्माण झाल्यामुळे तो आरतीच्या वेळी कोसळतो. मग मुक्ता आपल्या वडिलांना अश्या अवस्तेत बघून अर्धवट थांबलेली आरती पूर्ण करते.
वाचा: 'पोन्नियिन सेलवन' प्रदर्शनापूर्वी थिएटर मालकाला धमकी

मुक्ताने संबळ वाजवल्यामुळे मुक्ताच्या कुटुंबाला रावसाहेब घराबाहेर काढतात. स्त्रीने घरात संबळ वाजवू नये म्हणून रावसाहेब युवराजला दुसरा संबळ वादक शोधायला सांगतात. युवराजने शोधलेल्या संबळवाल्यांना मोठ्या शिताफीने सारंग व पप्या दूर सारतात. कुणालाही नगरकर वाड्यावर पोहोचू देत नाहीत. आता या नवरात्रीत रावसाहेब मुक्ताला संबळ वाजवण्याची संधी देतील का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

IPL_Entry_Point

विभाग