मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  shriya pilgaonkar: मालिका, चित्रपट, वेबसीरिज... पिळगावकरांची श्रिया जिंकतेय चाहत्यांची मनं

shriya pilgaonkar: मालिका, चित्रपट, वेबसीरिज... पिळगावकरांची श्रिया जिंकतेय चाहत्यांची मनं

Aarti Vilas Borade HT Marathi
Apr 25, 2023 08:26 AM IST

Shriya Pilgaonkar Birthday: आज २५ एप्रिल रोजी श्रियाचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया तिच्याविषयी काही खास गोष्टी…

Shriya Pilgaonkar
Shriya Pilgaonkar

मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय कपल म्हणून अभिनेते सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर ओळखले जातात. त्यांची मुलगी श्रिया पिळगावकर देखील कमी नाही. तिने आजवर काही मोजक्याच चित्रपटांमध्ये काम करत प्रेक्षकांची प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. आज २५ एप्रिल रोजी श्रियाचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने आपण जाणून घेऊया तिच्याविषयी काही खास गोष्टी...

श्रिया पिळगावकरने आजवर काही मोजक्याच चित्रपटांमध्ये काम करत अभिनयाच्या जोरावर स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिने वयाच्या पाचव्या वर्षी 'तू तू मैं मैं' या हिंदी मालिकेत काम केले आहे. या मालिकेतून तिने अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर तिने ‘एकुलती एक’ या चित्रपटाद्वारे मोठ्या पडद्यावर पदार्पण केले. हा चित्रपट २०१३ साली प्रदर्शित झाला होता.
वाचा: “यशोदा - गोष्ट श्यामच्या आईची” मालिका नव्या वेळेत येणार प्रेक्षकांच्या भेटीला

त्यानंतर श्रियाने शाहरुखच्या फॅन या चित्रपटात काम केले आहे. शिवाय अतिशय लोकप्रिय सीरिज 'मिर्झापूर'मध्ये देखील ती दिसली होती. श्रियाच्या अभिनयाने फ्रान्स चित्रपट निर्माता क्लाउड लेलचला देखील भूरळ घातली होती. त्याने त्याच्या 'अन प्लस उन' या फ्रान्स चित्रपटाची श्रियाला ऑफर दिली होती.

आज श्रिया सर्वांची आवडती अभिनेत्री आहे. ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. सतत तिचे फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करताना दिसते. तिचे बोल्ड फोटो नेहमी सर्वांचे लक्ष वेधून घेत असतात.

IPL_Entry_Point

विभाग