मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Shah Rukh Khan: गौरी आणि मुलांना कसा वाटला ‘पठाण’? चाहत्याच्या प्रश्नावर शाहरुख म्हणाला...

Shah Rukh Khan: गौरी आणि मुलांना कसा वाटला ‘पठाण’? चाहत्याच्या प्रश्नावर शाहरुख म्हणाला...

Harshada Bhirvandekar HT Marathi
Jan 13, 2023 07:37 AM IST

Shah Rukh Khan: आपल्या व्यस्त वेळापत्रकातून थोडासा वेळ बाजूला काढत शाहरुख खानने नेहमीप्रमाणे चाहत्यांसोबत ‘आस्क एसआरके’ सेशन केलं.

Shah Rukh Khan
Shah Rukh Khan

Shah Rukh Khan: बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याचा ‘पठाण’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट रिलीज व्हायला आता अवघे काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. या चित्रपटासाठी आता शाहरुख खानच्या चाहत्यांची उत्सुकता देखील वाढली आहे. शाहरुख खान देखील ‘पठाण’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त झाला आहे. या दरम्यान आपल्या व्यस्त वेळापत्रकातून थोडासा वेळ बाजूला काढत त्याने नेहमीप्रमाणे चाहत्यांसोबत ‘आस्क एसआरके’ सेशन केलं. यात त्याला एका चाहत्याने कुटुंबाला ‘पठाण’ कसा वाटला? असा प्रश्न केला होता.

शाहरुख खान नेहमीच आपल्या चाहत्यांच्या प्रश्नांना बिनधास्त उत्तर देतो. यावेळी देखील शाहरुखने चाहत्याच्या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. एका चाहत्याने शाहरुख खानला प्रश्न विचारला की, ‘तुमच्या कुटुंबाने पठाण चित्रपट पाहिला का? त्यांची प्रतिक्रिया काय होती?’. या प्रश्नाला उत्तर देताना शाहरुख खान म्हणाला की, ‘आतापर्यंत हा चित्रपट कुणीही पाहिलेला नाही. केवळ चित्रपटावर काम करणाऱ्या टेक्निशियन टीमने हा चित्रपट पहिला आहे.’ अर्थात शाहरुख खानने हे स्पष्ट केलं की, पत्नी गौरी किंवा तिन्ही मुलांपैकी एकानेही ‘पठाण’ चित्रपट पाहिलेला नाही.

यावेळी एकाने पठाणच्या ट्रेलरवर कुटुंबाची काय प्रतिक्रिया होती? असे देक्खील विचारले. त्यावर उत्तर देताना शाहरुख खान म्हणाला की, माझा छोटा मुलगा अबराम याला ट्रेलरमधील जेट पॅक सीन खूप आवडला. नुकताच शाहरुख खानच्या ‘पठाण’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. यात शाहरुखचे दमदार अॅक्शन सीन पाहायला मिळत आहेत. वयाच्या ५७व्या वर्षी शाहरुख खानने सिक्स पॅक अॅब्स बनवले आहेत. तर, दीपिका पदुकोण देखील खूपच सुंदर दिसत आहे. दीपिका हातात बंदूक घेऊन स्टंट करताना दिसत आहे.

तर, जॉन अब्राहम या चित्रपटात नकारात्मक भूमिका साकारताना दिसत आहे. शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांचा ‘पठाण’ हा चित्रपट २५ जानेवारी २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात जॉन इब्राहिम देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या अॅक्शन थ्रीलर चित्रपटाचे दिग्दर्शन दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद यांनी केले आहे.

IPL_Entry_Point