मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  जेव्हा कंगना- हृतिकच्या भांडणाची रणबीर कपूरने उडवलेली थट्टा; मागावी लागली होती माफी

जेव्हा कंगना- हृतिकच्या भांडणाची रणबीर कपूरने उडवलेली थट्टा; मागावी लागली होती माफी

Payal Shekhar Naik HT Marathi
Aug 24, 2022 02:44 PM IST

Ranbir Kapoor Viral Video: कंगना रणौत आणि हृतिक रोशन यांच्यातील भांडण सर्वश्रुत आहे. आता रणबीर कपूरचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये तो त्यांच्या भांडणाचा उल्लेख करताना दिसतोय.

रणबीर कपूर
रणबीर कपूर

आजवर कंगना रणौतने हृतिक रोशनवर अनेक आरोप केले आहेत. सोशल मीडियावरही तिने हृतिकवर अनेकदा निशाणा साधला आहे. नुकताच हृतिकच्या 'विक्रम वेधा' चा टीझर प्रदर्शित झाला आहे. आणि आता अभिनेता रणबीर कपूरचा एक जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये त्याने कंगना आणि हृतिकचा मजेशीर पद्धतीने संबंध जोडला आहे. सोबतच त्याने नंतर माफीही मागितली आहे. हा चित्रपट प्रमोशनच्या वेळेचा व्हिडिओ आहे. यात रणबीरसोबत कतरिनाही दिसत आहे. ही व्हिडिओ क्लिप २०१७ मधील आहे, जेव्हा रणबीरचा 'जग्गा जासूस' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.

चित्रपट प्रमोशनसाठी खेळला होता गेम

कंगनाने हृतिकवर अनेक आरोप केले आहेत. २०२० मध्ये कंगनाने त्याला 'सिरियल स्कर्ट चेजर' म्हटले होते. तिने इतर वेळेसही त्याच्यावर निशाणा साधला आहे. आता एक जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये रणबीर कंगनाची खिल्ली उडवताना दिसत आहे. 'जग्गा जासूस' या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान रणबीरला कतरिना कैफला हातवारे करून कलाकारांची नावे समजावून सांगायची होती. कतरिनाने डोक्यावर एक फोटो धरला होता. त्याला पाहून रणबीर अॅक्शन करत होता आणि तिला समजावून सांगत होता की हा अभिनेता कोण आहे.

त्यानंतर रणबीरने माफी मागितली

पहिला फोटो हृतिक रोशनचा होता. यावर रणबीरने 'एक पल का जीना' ही डान्स स्टेप केली तेव्हा कतरिनाने त्याला लगेच ओळखलं. यानंतर कंगनाचा फोटो दाखवल्यावर रणबीरला काहीच समजले नाही. त्याने हृतिकसाठी केलेली ॲक्शन परत केली आणि गळा कापण्याची ॲक्शन केली. हे पाहताच कतरिना हसायला लागली आणि तिने ओळखले की ती कंगना आहे. नंतर रणबीर म्हणाला, सॉरी हृतिक, गेम जिंकण्यासाठी मला हे करावे लागले. सत्य काय आहे ते मला माहीत नाही. मी जे काही केलं ते खेळ जिंकण्यासाठी. खरंच मला माफ कर.'

IPL_Entry_Point