मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  रणबीर कपूर की आलिया भट्ट; दोघांपैकी जास्त श्रीमंत कोण?

रणबीर कपूर की आलिया भट्ट; दोघांपैकी जास्त श्रीमंत कोण?

Payal Shekhar Naik HT Marathi
Apr 19, 2022 04:00 PM IST

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर नुकतेच विवाहबंधनात अडकले आहेत. परंतु, आलिया आणि रणबीर यांपैकी कोणाकडे अधिक संपत्ती आहे, असा प्रश्न आता चाहत्यांना पडला आहे.

रणबीर कपूर की आलिया भट्ट
रणबीर कपूर की आलिया भट्ट (ANI)

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर नुकतेच विवाहबंधनात अडकले आहेत. सोशल मीडियावर अजूनही आलिया आणि रणबीरच्या लग्नाचे फोटो धुमाकूळ घालत आहेत. लग्नाच्या पाच दिवसानंतर आलिया पुन्हा कामावर परतली आहे. सध्या रणबीर आणि आलिया त्यांच्या 'ब्रम्हास्त्र' चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहेत. बॉलिवूडमधील हे कपल कोणत्या न कोणत्या कारणाने सोशल मीडियावर चर्चेत असतं. परंतु तुम्हाला माहिती आहे का या दोन्ही कलाकारांकडे एकूण किती संपत्ती आहे?

ट्रेंडिंग न्यूज

एका इंग्रजी वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, रणबीरकडे एकूण ३७७ कोटी रुपयांची संपत्ती आहे. तो अनेक जाहिराती आणि एंडोर्समेंटमधून पैसे कमावतो. त्याचबरोबर रणबीर बॉलिवूडमध्ये सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक आहे. त्याच्याकडे 'बीएमडबल्यू', 'मर्सिडीज', 'लेक्सस', 'ऑडी' आणि 'रेंज रोवर' सारख्या महागड्या गाड्याचं कलेक्शन आहे. त्यासह त्याच्या वांद्रे येथील घराची किंमत 30 कोटींच्या आसपास मानली जाते.

 

रणबीरकडे इतकी संपत्ती असली तरी त्याबाबतीत आलियाही मागे नाहीये. मध्यंतरी आलियाने लंडनमध्ये १८ कोटी रुपयांचं घर खरेदी केलं होतं. त्याचबरोबर तिच्याकडे 'इटर्नल सनशाईन' नावाचं प्रॉडक्शन हाऊसदेखील आहे. 'रेंज रोवर', 'इवोक', 'ऑडी', 'बीएमडबल्यू 7' अशा महागड्या गाड्या आलियाकडे देखील आहेतं. तिची एकूण संपत्ती ही १५८ कोटी रुपये असल्याचं रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे.

रणबीर आणि आलिया हे 2018 पासून रिलेशनशिपमध्ये होते. अखेर त्यांनी १४ एप्रिलला लग्नगाठ बांधली. या कपलला चाहत्यांकडून 'रालिया' हे नाव देखील दिलं गेलं आहे. त्यांना अनेकदा प्रमोशन्स, जाहिराती आणि विविध कार्यक्रमांमध्ये एकत्र पाहिलं गेलंय. 

IPL_Entry_Point

विभाग