मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  एक सिगरेटची हुक्की यायची अन घराच्या खिडकीतून उडी मारून जायची कंगना रणौत

एक सिगरेटची हुक्की यायची अन घराच्या खिडकीतून उडी मारून जायची कंगना रणौत

Payal Shekhar Naik HT Marathi
Mar 14, 2022 04:53 PM IST

व्यसनासाठी लोक काय काय करतात हे काही सांगायला नको. पण फिल्मी सितारे देखील त्यांच्या व्यसनासाठी धडपड करत असतील यावर विश्वास बसत नाही ना? पण हे खरं आहे, कंगना रणौत सिगरेट मिळवण्यासाठी चक्क खिडकीतून उडी मारून जायची. जाणून घेऊया आपल्या व्यसनासाठी तिने काय – काय जुगाड केले.

kangana ranaut
kangana ranaut (ht)

 एखाद्या गोष्टीचं व्यसन माणसाला काय-काय करायला भाग पाडेल सांगता येत नाही. तसाच प्रसिद्ध अभिनेत्री कंगना रणौत हिनेदेखील तिच्या स्मोकिंगच्या सवयीचा किस्सा शेअर केला होता. आता तिला कोणतेही व्यसन नसले तरी कधी काळी तिला सिगरेटचे व्यसन जडले होते. सुरूवातीला आपल्याला याचे व्यसन लागूच शकत नाही, असे तिला वाटत होते. मात्र नंतर जेव्हा सिगरेट मिळाली नाही तर ती त्यासाठी कशी धडपड करायची याचे किस्से सांगताना आज तिला हसू येतं.

ट्रेंडिंग न्यूज

स्वत: पॅकेट ठेवू लागली – आपल्याला ही सवय कशी लागली याविषयी बोलताना कंगनाने सांगितले की, १९ वर्षांची असताना ती ‘लम्हे’ चित्रपटचं शूट करत होती. त्यात तिचं जे कॅरेक्टर होतं जे खूप ट्रामाटाइज्ड होतं, जी नर्व्हसनेस मध्ये स्मोक करायची. तिला सिगरेट दिली जायची पण सोबतच तिला सवय लागू नये म्हणून लोक सांभाळून रहा असे देखील बोलायचे. पण तिला वाटायचे की या वाईट गोष्टीची सवय कशी लागू शकते. म्हणजे याने खोकला, उलट्या, चक्कर यायला लागते. शूटींगमध्ये सहा सात महिने गेले, पण तिला अजिबात वाटले नाही की तिला याची सवय झाली आहे. कधीतरी मित्र आल्यानंतर ती त्यांच्याकडून सिगरेट घ्यायची. पण नंतर मात्र हळू – हळू १० ते १२ सिगरेट होऊ लागले अन् तिचे स्वत: चे पाकीट ठेवायला सुरूवात केली.

सेल्फ कंट्रोलने सोडली सवय – सिगरेटचे व्यसन तर लागले होते पण पालकांच्या समोर मात्र तिला काही करता येत नव्हतं. पण कधीतरी एकदम त्रास व्हायचा, तलप लागायची. त्यासाठी ती प्लॅनिंग करून, खिडकीतून उडी मारून बाहेर जायची अन् काही करून स्मोकिंग करायची. जणू तिला कोणी गुलाम केलं आहे, असं वाटायचे. आणि एखाद्या गोष्टीने तिच्यावर राज्य करावे याने ती अधिक अस्वस्थ होती. त्यानंतर तिने योगा सरांना तिची अस्वस्थता सांगितली. आपल्यालाकोणीतरी गुलाम बनवले आहे, तलप येते आणि नंतर थकवा येतो. तिला नंतर समजले की, आयुष्यात असे काही नाही ज्याने तिला कंट्रोल केलं होतं, ते फक्त आपले विचार आहेत ज्यांनी आपल्याला गुलाम बनवलं. त्यागाचं अवलंब करा अन् चमत्कार पहा, हे तिने स्वत: अनुभवले. तिने हळू हळू स्मोकिंग तर सोडलीच शिवाय असे मित्र, रिलेशन पासून पण दूर झाली जे तिच्यासाठी घातक होते.

IPL_Entry_Point