मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Rakshabandhan २०२२: अमृता फडणवीसांचं हटके रक्षाबंधन; भावावर केली मिश्किल कमेंट, ‘धाकटा असला तरी…’

Rakshabandhan २०२२: अमृता फडणवीसांचं हटके रक्षाबंधन; भावावर केली मिश्किल कमेंट, ‘धाकटा असला तरी…’

Payal Shekhar Naik HT Marathi
Aug 11, 2022 01:30 PM IST

amruta fadnavis rakshabandhan: लोकप्रिय गायिका आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही रक्षाबंधन अगदी उत्साहात साजरं केलं. त्यांनी आपल्या भावावर एक मिश्किल कमेंट देखील केली आहे.

अमृता फडणवीस
अमृता फडणवीस

amruta fadnavis celebrates rakshabandhan 2022: लोकप्रिय गायिका अमृता फडणवीस या सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. त्यांच्या वक्तव्यामुळे त्या नेटकऱ्यांमध्ये चर्चेत असतात. त्यांना अनेकदा सोशल मीडियावर ट्रोलही करण्यात येतं. त्या नेहमीच आपले वैयक्तिक फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असतात. आज रक्षाबंधनाच्या दिवशी अमृता यांनीही मोठ्या उत्साहात रक्षाबंधन साजरं केलं आहे. आपल्या लहान भावाला राखी बांधून त्यांनी हा सण साजरा केला आहे. सोबतच त्यांचे काही फोटोही त्यांनी शेअर केले आहेत. यात त्यांनी आपल्या लहान भावावर मिश्किल अशी कमेंट देखील केली आहे.

अमृता यांनी त्यांच्या भावाला राखी बांधतानाचे दोन फोटो ट्विटरवर शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करताना त्यांनी लिहिलं, 'त्या सगळ्या भगिनींना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा ज्या स्वतःच्या पायावर उभ्या आहेत, मजबूत आहे, खंबीर आहेत, ताकदवान आहेत, खुल्या मनाच्या आहेत, शूर आहेत, कनवाळू आहेत, ज्यांचा निश्चय ठाम आहे, ज्या पटकन हार मानत नाहीत. आणि अशा सगळ्या भावांना देखील रक्षाबंधनाच्या शुभेच्छा जे विश्वासू आहेत, संवेदनशील आहेत, जबाबदार आहेत, जे दुसऱ्याचं ऐकून घेतात, विचार करतात, पाठीशी ठामपणे उभे राहणारे आहेत. आणि माझ्या लहान भावालासुद्धा रक्षाबंधनाच्या शुभेच्छा जो धाकटा असूनही माझ्यापेक्षा मोठा दिसतो.'

अमृता यांच्या ट्विटवर अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी त्यांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांचं हे ट्विट सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे.

IPL_Entry_Point