मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Rakhi Sawant Viral Video: मीडियासमोर आदिलने चुकून दाखवला हनिमून व्हिडीओ! राखी सावंत म्हणाली....

Rakhi Sawant Viral Video: मीडियासमोर आदिलने चुकून दाखवला हनिमून व्हिडीओ! राखी सावंत म्हणाली....

Harshada Bhirvandekar HT Marathi
Jan 24, 2023 09:10 AM IST

Rakhi Sawant Viral Video: राखी सावंत नुकतीच तिचा पती आदिल खानसोबत स्पॉट झाली. राखी सावंत पती आदिल खानसोबत मीडियाशी संवाद साधताना दिसली.

Rakhi-Adil
Rakhi-Adil

Rakhi Sawant Viral Video: बॉलिवूड आणि टीव्ही विश्वाची ‘ड्रामा क्वीन’ राखी सावंत नेहमीच काहीना काही कारणामुळे प्रसिद्धी झोतात असते. सध्या राखी तिच्या आदिल दुर्राणीसोबतच्या लग्नामुळे चर्चेत आली आहे. राखीच्या लग्नानंतर सोशल मीडियावर बराच गदारोळ माजला होता. मात्र, आता त्यांच्या नात्यातील तणाव दूर झाला असून, आता राखी आणि आदिल एकमेकांसोबत दिसत आहेत. नुकतीच त्यांनी एकत्र मीडियाची भेट देखील घेतली. यावेळी राखीच्या पतीने मीडियाला चुकून असा एक व्हिडीओ दाखवला, जो पाहून राखी देखील लाजेने लाल झाली.

राखी सावंत नुकतीच तिचा पती आदिल खानसोबत स्पॉट झाली. राखी सावंत पती आदिल खानसोबत मीडियाशी संवाद साधताना दिसली. दरम्यान, राखीने पतीला दुबईत दिलेले गिफ्ट दाखवण्यास सांगितले. यावेळी आदिलने फोनवर एक व्हिडीओ प्ले केला आणि माध्यमांच्या कॅमेऱ्यांना दाखवला. यावेळी राखी सानागत होती की, आदिलने आपल्याला सोन्याचा आयफोन भेट म्हणून दिला. मात्र, यावेळी मध्यम प्रतिनिधींचे चेहरे पाहून काहीतरी चुकतंय याचा अंदाज राखीला आला.

यानंतर राखीने आदिलच्या फोनकडे वळून पाहिलं, तर त्यात एक व्हिडीओ सुरू होता ज्यात सजवलेला बेड दिसत होता. या बेडवर फुलं होती, तर आदिल देखील बसलेला दिसत होता. हे पाहताच राखी लाजली आणि आदिलला म्हणाली की, ‘अरे जानू यात आयफोन कुठेय? यात बेड दिसतोय.. हे काय करतोयस तू...’ यानंतर सगळेच मोठमोठ्याने हसू लागले.

राखीने बॉयफ्रेंड आदिल दुर्रानीसोबत लग्न केले आहे. या लग्नाला तिने गेल्या सात महिन्यांपासून लपवून ठेवले होते. मात्र, यामागे कारण आदिल असल्याचे म्हटले जात होते. आपल्या लग्नाची घोषणा केल्यानंतर आदिल नाराज झाल्याचे राखीने म्हटले होते. आदिलमुळेच लग्नाची बातमी सार्वजनिकरीत्या सांगितली नव्हती, असे देखील राखी एक मुलाखतीत म्हणाली होती.

IPL_Entry_Point