मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Pathaan: ‘पठाण’मुळे चित्रपटगृहांना सुगीचे दिवस; बंद पडलेली ‘ही’ थिएटर्सही शाहरुखच्या चित्रपटासाठी उघडणार!

Pathaan: ‘पठाण’मुळे चित्रपटगृहांना सुगीचे दिवस; बंद पडलेली ‘ही’ थिएटर्सही शाहरुखच्या चित्रपटासाठी उघडणार!

Harshada Bhirvandekar HT Marathi
Jan 24, 2023 08:39 AM IST

Pathaan advance booking: ‘पठाण’च्या अॅडव्हान्स बुकिंगने ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाचे रेकॉर्ड देखील मोडीत काढले आहेत. शाहरुख खानच्या या चित्रपटामुळे थिएटर्स पुन्हा एकदा हाऊसफुल होणार आहेत.

Pathaan
Pathaan

Pathaan: बॉलिवूड किंग शाहरुख खानच्या ‘पठाण’ या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाचे आगाऊ बुकिंग सुरू झाले असून, त्याला मोठा प्रतिसाद मिळत आहे. ‘पठाण’ हा २०२३मधील सगळ्यात मोठा बॉलिवूड चित्रपट आहे. या चित्रपटात शाहरुख खान, दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम हे कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत. या चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंगला ज्याप्रकारे प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळत आहे, ते पाहून थिएटर मालक देखील सुखावले आहेत.

‘पठाण’च्या अॅडव्हान्स बुकिंगने ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाचे रेकॉर्ड देखील मोडीत काढले आहेत. शाहरुख खानच्या या चित्रपटामुळे अनेक सिंगल स्क्रीन थिएटर्स पुन्हा एकदा प्रेक्षकांनी हाऊसफुल होणार आहेत. काही सिंगल स्क्रीन चित्रपटगृहे गेल्या काही काळापासून बंद पडली होती. मात्र, 'पठाण'ची क्रेझ पाहून, आता ही सिंगल स्क्रीन चित्रपटगृहे पुन्हा सुरू करण्यात येणार आहेत.

गेली दोन वर्ष कोरोना महामारीने सगळ्याच क्षेत्रांचे कंबरडे मोडले होते. यात सगळ्यात मोठा फटका बसला तो सिंगल स्क्रीन थिएटर्सला. अनेक महिन्यांपासून बंद पडलेली ही चित्रपटगृहे अद्यापपर्यंत बंदच होती. मात्र, शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटामुळे ही चित्रपटगृहे पुन्हा एकदा सुरू होणार आहेत. ‘पठाण’ची क्रेझ दिवसेंदिवस वाढत चालली आहे. या चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद पाहून आता बंद पडलेली सिंगल स्क्रीन थिएटर्स सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्वीट करत या संदर्भात माहिती दिली आहे. ‘पठाण’च्या निमित्ताने देशभरातील २५ सिंगल स्क्रीन थिएटर्स पुन्हा सुरू होणार आहेत. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले की, 'पठाणने सिंगल स्क्रीन थिएटर्सना पुनरुज्जीवित केले आहे. जबरदस्त अॅडव्हान्स बुकिंगमुळे ‘पठाण’ थिएटरच्या व्यवसायाला पुनरुज्जीवित करण्यासाठी सज्ज झाला आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, भारतभरातील २५ सिंगल स्क्रीन थिएटर जे बंद झाले होते, ते या आठवड्यात पुन्हा उघडणार आहेत.’

IPL_Entry_Point