मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Video: डोई तुळस अन् कपाळी टिळा; प्राजक्ता गायकवाड झाली पंढरीच्या वारीत दंग
प्राजक्ता गायकवाड
प्राजक्ता गायकवाड
27 June 2022, 14:21 ISTPayal Shekhar Naik
  • Share on Twitter
  • Share on FaceBook
27 June 2022, 14:21 IST
  • (prajakta gaikawad)पुन्हा एकदा प्राजक्ता सोशल मीडियावर चर्चेत आहे. प्राजक्ता सध्या भक्तिरसात गुंग झाली असून ती पंढरीच्या वाटेवर रवाना झाली आहे.

लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड (prajakta gaikawad) सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती नेहमीच तिचे निरनिराळे फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते. प्राजक्ताने 'स्वराज्य रक्षक संभाजी' मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं. प्राजक्ताने मालिकेत संभाजी राजांच्या पत्नी येसूबाईंची भूमिका साकारली होती. तिच्या त्या भूमिकेने तिने प्रेक्षकांच्या मनाला गारुड घातलं. आता प्राजक्ताचे काही फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांमध्ये प्रचंड वायरल होत आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

करोनामुळे गेली दोन वर्ष न झालेली वारी यावर्षी जोशात विठुरायाच्या नावाचा गजर करत निघाली आहे. आयुष्यात एकदा तरी वारी करावी असा मोह प्रत्येक मराठी मनाला होतो. तसाच मोह जणू प्राजक्ताला झाला आहे. आणि तिने वारीत सहभागी होत अनेकांना चकित केलं आहे. प्राजक्ताने तिचे काही फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. त्यात तिने जांभळ्या रंगाची इरकली साडी परिधान केली आहे. कपाळी गंध आणि केशरी टिळा लावून डोईवर तुळस घेऊन ती पंढरीची वाट चालते आहे. ती फक्त वारीत सहभागी झाली नाहीये तर ती वारीचा संपूर्ण आनंद देखील घेते आहे.

तिने शेअर केलेल्या विडिओमध्ये तिने ताल मृदूंगाच्या तालावर ठेका धरला आहे सोबतच काही ठिकाणी ती फुगडी घालताना देखील दिसत आहे. आतापर्यंतचा सगळ्यात भारी फोटो असं म्हणत तिने हे फोटो शेअर केले आहेत. तिच्या या भक्तिमय व्हिडियोला चाहत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे.

  • Share on Twitter
  • Share on FaceBook

विभाग