मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Urfi Javed: ऊर्फी जावेदच्या कपड्यांवरून सुरू असलेल्या वादात आता ‘या’ महिला नेत्याची उडी

Urfi Javed: ऊर्फी जावेदच्या कपड्यांवरून सुरू असलेल्या वादात आता ‘या’ महिला नेत्याची उडी

Aarti Vilas Borade HT Marathi
Jan 06, 2023 02:48 PM IST

Urfi Javed Vs Chitra Wagh : गेल्या काही दिवसांपासून चित्रा वाघ आणि उर्फी जावेद यांच्यामध्ये जोरदार भांडण सुरू आहे. अशातच एका भाजप महिला नेत्याने भाजपच्या जनआक्रोश सभेतील व्हिडीओ शेअर करत चित्रा वाघ यांना सुनावलं आहे.

उर्फी जावेद
उर्फी जावेद (HT)

Anjali Damania on Urfi Javed Vs Chitra Wagh : गेल्या काही दिवसांपासून मॉडेल, अभिनेत्री उर्फी जावेद आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यामध्ये चांगलीच जुंपली आहे. चित्रा वाघ यांनी मुंबई पोलिसांकडे उर्फीवर कारवाई करण्याची मागणी केली. सध्या त्या दोघींमध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून जोरदार भांडण पाहायला मिळते. अशातच एका महिला नेत्याने या भांडणात उडी घेतली आहे. उर्फीला सुनावणाऱ्या चित्रा वाघ यांना तिने सवाल केला आहे.

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी भाजपाच्या जनआक्रोश महासभेतील एक व्हिडीओ रिट्वीट करत ही कोणती संस्कृती आहे? असा प्रश्न चित्रा वाघ यांना विचारला आहे. 'प्रिय चित्रावाघ ताई, भाजपाच्या रमेश बिदुरी यांच्या जनआक्रोश महासभेतील हा व्हिडीओ असून या बद्दल आपलं काय मत आहे? याला आपण कोणती संस्कृती म्हणाल? सांस्कृतिक कार्यक्रम म्हणाल का?' असा सवाल केला आहे.

आम आदमी पक्षाचे नेते आशुतोष सेंगर यांनी राजस्थानमध्ये भाजपाच्या जनआक्रोश यात्रेदरम्यान नाच होत असल्याचा व्हिडीओ ट्वीट केला होता. यावरून अंजली दमानिया यांनी चित्रा वाघ यांचे लक्ष्य केले.

या विषयावर एका वृत्तवाहिनीशी बोलताना अंजली दमानिया म्हणाल्या की, 'चित्रा वाघ यांनी उर्फी जावेद विरोधात केलेले विधान अतिशय चुकीचे आहे. कोणी काय घालावं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. चित्रा वाघ यांना यावर बोलण्याची गरज नाही. त्यांनी ज्या शब्दाचा वापर केला तो अपेक्षित नव्हता.'

IPL_Entry_Point

विभाग