मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  New Release On OTT: 'स्कूप' ते 'असुर २', या आठवड्यात ओटीटीवर रिलीज होणाऱ्या वेब सीरिज

New Release On OTT: 'स्कूप' ते 'असुर २', या आठवड्यात ओटीटीवर रिलीज होणाऱ्या वेब सीरिज

Aarti Vilas Borade HT Marathi
May 30, 2023 04:08 PM IST

New Release On OTT: जर तुम्हाला नवी वेब सीरिज पाहायची असेल तर ही बातमी नक्की वाचा…

New Release On OTT
New Release On OTT

आजकाल प्रेक्षकांना घरबसल्या मनोरंजन हवे असते. त्यांना घरबसल्या टीव्हीवर किंवा मोबाईलवर चित्रपट व सीरिज पाहायच्या असतात. ओटीटी प्लॅटफॉर्म आल्यापासून प्रेक्षकांना घरबसल्या अनेक चित्रपट आणि सीरिज पाहाता येत आहेत. आता या आठवड्यात ओटीटी प्लॅटफॉर्मवर कोणत्या सीरिज प्रदर्शित होणार जाणून घेऊया...

दिग्दर्शक हंसल मेहता यांची स्कूप ही वेब सीरिज २ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सीरिजमध्ये सस्पेन्स आणि ड्रामा पाहायला मिळणार आहे. ही सीरिज नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

'स्कूल ऑफ लाइस' ही वेब सीरिज २ जून रोजी डिझ्स्ने प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. या सीरिजमध्ये हरवलेल्या मुलाचा शोध घेण्याची कथा दाखवण्यात येणार आहे.

'हत्यापुरी' हा चित्रपट देखील या आठवड्यात रिलीज होणार आहे. हा चित्रपट 2 जून रोजी झी-5 वर रिलीज होणार आहे.

अभिनेता अर्शद वारसीची 'असुर' ही सीरिज तुफान गाजली होती. या सीरिजचा दुसरा सिझन १ जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिझनची सर्वजण आतुरतेने वाट पाहात आहेत.

IPL_Entry_Point

विभाग