मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Kuttey Box office Collection: बॉक्स ऑफिसवर ‘कुत्ते’ झाला सपाट! तीन दिवसांत अवघी ‘इतकी’ कमाई

Kuttey Box office Collection: बॉक्स ऑफिसवर ‘कुत्ते’ झाला सपाट! तीन दिवसांत अवघी ‘इतकी’ कमाई

Harshada Bhirvandekar HT Marathi
Jan 16, 2023 12:32 PM IST

Kuttey Box office Collection: ‘कुत्ते’ चित्रपटात अनेक दिग्गज कलाकारांची फौज असल्याने प्रेक्षकांना या चित्रपटाकडून भरपूर अपेक्षा होत्या. मात्र, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपाटून आपटला आहे.

Kuttey
Kuttey

Kuttey Box office Collection: बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर आणि अभिनेत्री तब्बू यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘कुत्ते’ हा चित्रपट नुकताच बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात अनेक दिग्गज कलाकारांची फौज असल्याने प्रेक्षकांना या चित्रपटाकडून भरपूर अपेक्षा होत्या. मात्र, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपाटून आपटला आहे. ‘कुत्ते’ या चित्रपटाला रिलीज होऊन तीन दिवस उलटले आहेत. मात्र, तीन दिवसांत या चित्रपटाने अवघी ३ कोटींच कमाई केली आहे.

आसमान भारद्वाजचा हा चित्रपट बॉक्स ऑफिस कलेक्शनच्या बाबतीत मागे पडला आहे. पहिल्याच दिवशी संथ सुरुवात झाल्याने प्रेक्षकांना हा चित्रपट फारसा आवडलेला नाही, असे चित्र निर्माण झाले. आता हा चित्रपट प्रदर्शित होऊन तीन दिवस उलटले, तरी हा चित्रपट ३ कोटींपेक्षा जास्त कमाई करू शकलेला नाही. अर्जुन कपूर स्टारर 'कुत्ते' या चित्रपटाने तिसऱ्या दिवशीच्या बॉक्स ऑफिसवर १.३० कोटींची कमाई केली आहे.

‘कुत्ते’च्या एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल बोलायचे झाले, तर अर्जुन कपूरचा हा चित्रपट आतापर्यंत केवळ ३.३९ कोटींचा व्यवसाय करू शकला आहे. ‘कुत्ते’ हा चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षकांनी देखील वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. या चित्रपटातील दमदार अभिनयामुळे प्रेक्षक देखील चित्रपटाचे कौतुक करत आहेत. काही चाहते हा चित्रपट पाहण्याचा सल्ला देत आहेत. तर, काही लोक या चित्रपटावर बहिष्कार टाकत आहेत. बॉयकॉट बॉलिवूडचा काहीसा फटका या चित्रपटाला देखील बसला आहे.

'कुत्ते' या चित्रपटाचे दिग्दर्शन आसमान भारद्वाज यांनी केले आहे. अर्जुन कपूर, तब्बू, नसिरुद्दीन शाह, कोंकणा सेन शर्मा, कुमुद मिश्रा, राधिका मदन हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत झळकले आहेत. हा चित्रपट१३ जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाला संगीत विशाल भारद्वाज यांनी दिले असून, गुलजार यांनी गाणी लिहिली आहेत.

IPL_Entry_Point

विभाग