मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Khupte Tithe Gupte: 'खुपते तिथे गुप्ते'च्या पहिल्या भागात एकनाथ शिंदे लावणार हजेरी

Khupte Tithe Gupte: 'खुपते तिथे गुप्ते'च्या पहिल्या भागात एकनाथ शिंदे लावणार हजेरी

Aarti Vilas Borade HT Marathi
May 15, 2023 02:53 PM IST

Khupte Tithe Gupte: जवळपास १० वर्षानंतर ‘खुपते तिथे गुप्ते’ हा जबरदस्त व अफलातून कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे

Khupte Tithe Gupte
Khupte Tithe Gupte

छोटया पडद्यावर सध्या अनेक नव्या मालिका आणि नवे शो प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. यात आता लोकप्रिय चॅट शो ‘खुपते तिथे गुप्ते’ जवळपास १० वर्षांनंतर प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्यामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता पाहायला मिळते. आता या कार्यक्रमाच्या पहिल्या भागात कोण सहभागी होणार हे समोर आले आहे.

प्रेक्षकांना बसणार आहेत धक्क्यावर धक्के कारण 'खुपते तिथे गुप्ते' च्या मंचावर दिसणार आहेत महाराष्ट्राचे लाडके माननीय मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे साहेब. झी मराठीने नुकताच एक प्रोमो आपल्या पेज वर शेअर केलाय त्यामध्ये मुख्यमंत्री बोलताना दिसतायत 'खुपते तिथे गुप्ते इथे प्रश्नांना धार आहे, पण मी पण तयार आहे'.

अजून एक भन्नाट गोष्ट म्हणजे जबरदस्त भारदस्त व्यक्तीचे होणार आहे या मंचावर आगमन ज्यांचा आहे खूप बोलबाला, महाराष्ट्राचा बुलंद आवाज म्हणजे महाराष्ट्राचे आवडते राजकीय नेते मनसेचे सर्वेसर्वा माननीय श्री. राज ठाकरे साहेब. गुप्तेंच्या खोचक नी धारदार प्रश्नांना श्री राज साहेब देतील तेवढीच धारदार उत्तरे.

‘खुपते तिथे गुप्ते’चं हे पर्व सर्वार्थाने वेगळं असणार आहे कारण, या पर्वाच खास आकर्षण असणार आहे ती म्हणजे एक खास‘खुर्ची’. अशीखुर्ची जिच्यासाठी सगळीकडे चढाओढ पाहायला मिळतेय.मग, ते नोकरीमध्ये असो,कॉर्पोरेट जग असो किंवा मग राजकारण. पण, या शोची ही खुर्ची सर्वार्थानं वेगळी असणार आहे. कारण, या खुर्चीवर जे सेलिब्रिटी, राजकारणी किंवा मान्यवर बसणार आहेत, त्यांना अवधूत गुप्ते असे काही प्रश्न विचारणार आहेत जे त्यांना खुपणार नाही, तर टोचणार आहेत. या आधी देखील ‘खुपते तिथे गुप्ते’ या लोकप्रिय टीव्ही शोने खूप प्रसिद्धी मिळवली होती.

IPL_Entry_Point

विभाग