मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Kantara: बॉलिवूडवर भारी पडला ‘कांतारा’; बॉयकॉट ट्रेंडला मात देत पूर्ण केले १०० दिवस!

Kantara: बॉलिवूडवर भारी पडला ‘कांतारा’; बॉयकॉट ट्रेंडला मात देत पूर्ण केले १०० दिवस!

Harshada Bhirvandekar HT Marathi
Jan 23, 2023 09:33 AM IST

Kantara Movie 100 Days in theater: ‘कांतारा’ हा चित्रपट कन्नड भाषेत अवघ्या २० कोटींच्या बजेटमध्ये बनवण्यात आला होता. यानंतर या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालायला सुरुवात केली होती.

Kantara
Kantara

Kantara Movie 100 Days in theater: रिषभ शेट्टी लिखित-दिग्दर्शित आणि अभिनित ‘कांतारा’ या चित्रपटाने साऊथच नव्हे, तर बॉलिवूडमध्येही धुमाकूळ घातला. या चित्रपटाच्या हिंदी व्हार्जनला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली आहे. ‘कांतारा’ या चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीने थिएटरमध्ये १०० दिवस पूर्ण केले आहेत. इतकंच नाही तर, हा चित्रपट अजूनही अनेक चित्रपटगृहांमध्ये चालू आहे. प्रेक्षकांचा या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटानेही बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे.

चित्रपटाच्या प्रॉडक्शन हाऊसने ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिली आहे. त्यांनी ट्विटमध्ये लिहिले की, 'कांतारा हिंदीने खूप चांगला व्यवसाय केला आहे. पारंपारिक लोकसाहित्यावर आधारित या चित्रपटाने चित्रपटगृहात १०० दिवस पूर्ण केले आहेत. याबद्दल आम्ही आमच्या प्रेक्षकांचे मनापासून आभार व्यक्त करतो. चित्रपटाशी संबंधित लोकही यावेळी खूप आनंदी झाले.’

विशेष म्हणजे ‘कांतारा’ हा चित्रपट कन्नड भाषेत अवघ्या २० कोटींच्या बजेटमध्ये बनवण्यात आला होता. यानंतर या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालायला सुरुवात केली होती. कन्नडनंतर चित्रपटाच्या निर्मात्यांनी हा चित्रपट तेलुगु आणि हिंदीसह अनेक भाषांमध्ये प्रदर्शित केला होता. या चित्रपटाने रेकॉर्डब्रेक व्यवसाय करून इतिहास रचला. या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन ऋषभ शेट्टी यांनी केले आहे. त्याच वेळी हा चित्रपट आधी कन्नड आणि नंतर हिंदीत प्रदर्शित झाला.

‘कांतारा’ चित्रपटात रिषभ शेट्टी, सप्तमी गौडा आणि किशोर कुमार यांच्याही मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत जवळपास ४०० कोटी रुपयांची कमाई केली आहे. हा चित्रपट २०२२च्या लोकप्रिय चित्रपटांपैकी एक आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना चांगलाच आवडला होता. भारतातील गाव-जंगलाची आणि एका आदिवासी समुदायाची कथा या चित्रपटात मांडण्यात आली होती.

IPL_Entry_Point

विभाग