मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  पहिल्या आठवड्यात Jug Jugg Jeeyo ची बॉक्स ऑफिसवर पकड, चार दिवसात केली इतकी कमाई
जुग जुग जियो
जुग जुग जियो
27 June 2022, 20:08 ISTPayal Shekhar Naik
  • Share on Twitter
  • Share on FaceBook
27 June 2022, 20:08 IST
  • (Jug Jugg Jeeyo box office collection)वरुण, कियारासोबत अनिल कपूर आणि नीतू कपूर यांच्या अभिनयाने सजलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली सुरुवात केली आहे.

लोकप्रिय बॉलिवूड अभिनेता वरुण धवन आणि अभिनेत्री कियारा आडवाणी यांच्या 'जुग जुग जियो' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवायला सुरुवात केली आहे. २४ जून रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळते आहे. वरुण, कियारासोबत अनिल कपूर आणि नीतू कपूर यांच्या अभिनयाने सजलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली सुरुवात केली आहे. राज मेहता दिग्दर्शित या चित्रपटाने प्रदर्शनापूर्वी ऍडव्हान्स बुकिंगने तब्बल ५ कोटींची कमाई केली होती. आता पहिल्या दिवशी प्रेक्षकांनी चित्रपटासाठी फार गर्दी केली नसली तरी शनिवार रविवारी चित्रपटाच्या तिकीटबारीवर गर्दी दिसून आली. 'भूलभुलैया २' नंतर 'जुग जुग जियो' ने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

ट्रेंडिंग न्यूज

यापूर्वी प्रदर्शित झालेला 'भूलभुलैया २' बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. त्यानंतर आलेले 'धाकड़', 'अनेक', 'सम्राट पृथ्‍वीराज', 'जनहित में जारी' आणि 'निकम्‍मा' हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर खास कमाई करू शकले नाहीत. त्यानंतर आलेल्या 'जुग जुग जियो' मुळे प्रेक्षकांची पावलं पुन्हा सिनेमागृहाकडे वळली आहेत. एका वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, या चित्रपटाने पहिल्या दिवशी ९ कोटी २८ लाखांची कमाई केली आहे. तर दुसऱ्या दिवशी चित्रपटाने १२ कोटी ५५ लाखांची कमाई केली आहे. तर तिसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी चित्रपटाने १५ कोटी १० लाखांची कमाई केली आहे. या तीन दिवसात चित्रपटाने ३६ कोटी ९३ लाखांचा गल्ला जमवला आहे.

आज सोमवारी देखील चित्रपट ५ ते ७ कोटींची कमाई करेल असा अंदाज बांधला जातोय. त्यामुळे या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद लाभल्याचं चित्र आहे.

  • Share on Twitter
  • Share on FaceBook

विभाग