मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Janhit Mein Jaari: नुसरत भरूचाच्या ‘जनहित में जारी’ला बॉक्सऑफिसवर घरघर

Janhit Mein Jaari: नुसरत भरूचाच्या ‘जनहित में जारी’ला बॉक्सऑफिसवर घरघर

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Jun 14, 2022 05:56 PM IST

Box Office collection of Janhit Mein Jaari:

Nushrat Bharucha
Nushrat Bharucha

Janhit Mein Jaari Box Office Day 4: अभिनेत्री नुसरत भरूचा हिचा 'जनहित मे जारी' या सिनेमानं चौथ्या दिवशी बॉक्सऑफिसवर मान टाकली आहे. प्रदर्शनानंतरचे पहिले तीन दिवस या चित्रपटाला माउथ पब्लिसिटीचा फायदा झाला. मात्र, चौथ्या दिवशी चित्रपटाच्या कमाईचा आकडा कमालीचा घसरला आहे.

'जनहित में जारी' या चित्रपटाचं समीक्षकांनी कौतुक केलं होतं. मात्र, प्रेक्षकांना हा चित्रपट फार पसंत पडला नसल्याचं दिसत आहे. १० जून रोजी सिनेमागृहांमध्ये झळकलेल्या या चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये दुसऱ्या दिवशी तब्बल ९०.७० टक्के वाढ झाली होती. तिसऱ्या दिवशी ही वाढ १४.६३ टक्के होती. चौथ्या दिवशी मात्र ६७ टक्क्यांची घसरण झाली आहे. चित्रपटानं आतापर्यंत एकूण २.५० कोटींचा गल्ला जमवला आहे. चित्रपटाचं बजेट २० कोटींचं असल्याचं बोललं जात आहे. हा खर्चही वसूल होईल की नाही याबाबत साशंकता आहे.

'जनहित में जारी' या चित्रपटाला IMDb रेटिंग ८.१ मिळाली आहे. ३६०० मतांच्या आधारे ही रेटिंग ठरवण्यात आली आहे. चित्रपटात नुसरत भरूचा एका सेल्सगर्लच्या भूमिकेत असून ती कंडोम विकण्याचं काम करते. चित्रपटाच्या कथेमुळं प्रेक्षक सुरुवातीला खेचले गेले होते, मात्र हळूहळू त्यांचा भ्रमनिरास होत असल्याचं दिसत आहे.

चार दिवसांचे आकडे:

पहिला दिवस: ४३ लाख

दुसरा दिवस: ८२ लाख

तिसरा दिवस: ९४ लाख

चौथा दिवस: ३१ लाख

पिक्चर फ्लॉप झाला म्हणून रडली होती नुसरत

चित्रपट निर्मात्यांना 'जनहित में जारी' पासून अद्यापही आशा असल्या तरी याआधी आकाशवाणी हा चित्रपट फ्लॉप झाल्यामुळं नुसरत भरुचा अक्षरश: रडली होती. तिनं स्वत:च एका मुलाखतीत ही कबुली दिली होती. त्या चित्रपटावर आताच्या तुलनेत बराच पैसा लागलेला होता. तो बुडाल्यामुळं तिला रडू आलं होतं, असं तिनं सांगितलं.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या