मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  International Women's Day: ‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेत साजरा होणार महिला दिन! महिला मंडळींसाठी खास सरप्राईज!

International Women's Day: ‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेत साजरा होणार महिला दिन! महिला मंडळींसाठी खास सरप्राईज!

Harshada Bhirvandekar HT Marathi
Mar 08, 2023 12:04 PM IST

International Women's Day in Thipkyanchi Rangoli: ‘ठिपक्यांची रांगोळी’ या मालिकेत कानिटकर परिवार त्याच्या कुटुंबातील महिला मंडळींसाठी खास कार्यक्रम आयोजित करणार आहेत.

Thipkyanchi Rangoli
Thipkyanchi Rangoli

International Women's Day in Thipkyanchi Rangoli: आजचा दिवस अर्थात ८ मार्च जगभरात जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. समस्त स्त्री वर्गाच्या कर्तृत्वाला सलाम करण्यासाठी आजच्या दिवशी अनेक वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. मराठी मालिकांमध्ये महिला दिनाच्या निमित्ताने कथानकात अनेक सुंदर ट्वीस्ट पाहायला मिळतात. छोट्या पडद्यावर देखील आज महिला दिनाचा उत्साह पाहायला मिळणार आहे. ‘ठिपक्यांची रांगोळी’ या लोकप्रिय मालिकेत देखील हटके पद्धतीने महिला दिन साजर करण्यात येणार आहे.

‘ठिपक्यांची रांगोळी’ या मालिकेत कानिटकर परिवार त्याच्या कुटुंबातील महिला मंडळींसाठी खास कार्यक्रम आयोजित करणार आहेत. यावेळी घरातील सगळी पुरुष मंडळी महिला वर्गाच्या डोळ्यांवर पट्टी बांधून त्यांना अंगणात आणणार असून, त्यांच्यासाठी केलेला खास बेत देऊन सरप्राईज देणार आहेत. यावेळी सगळ्यांनी केलेला हा प्लान पाहून महिला वर्ग देखील आनंदी होणार आहे. केवळ खाण्याचा बेतच नाही, तर यावेळी कानिटकर पुरुष मंडळी आपल्या मनातील भावना व्यक्त करून सगळ्यांना शुभेच्छा देणार आहेत.

‘ठिपक्यांची रांगोळी’ या मालिकेत नेहमीच वेगवेगळ्या विषयांवर भाष्य केलं जातं. आनंद, विनोद आणि कुटुंबातील हळवे बंध यातून कथानक अतिशय हलक्याफुलक्या पद्धतीने मांडलं जातं. या मालिकेत जागतिक महिला दिन देखील अशाच हटके पद्धतीने साजरा केला जाणार आहे. या मालिकेतील शशांक आणि अपूर्वा यांची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली आहे. तर, या मालिकेतील कानिटकर कुटुंब देखील प्रेक्षकांच्या कुटुंबाचा भाग बनले आहे. आता प्रेक्षकांना ‘ठिपक्यांची रांगोळी’ या मालिकेच्या येत्या भागात आणखी मनोरंजक स्टोरी पाहायला मिळणार आहे.

IPL_Entry_Point