मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Independence Day: अजूनही आपल्याला स्वातंत्र्य मिळायचं बाकी आहे; कार्तिक आर्यनने व्यक्त केली खंत

Independence Day: अजूनही आपल्याला स्वातंत्र्य मिळायचं बाकी आहे; कार्तिक आर्यनने व्यक्त केली खंत

Payal Shekhar Naik HT Marathi
Aug 15, 2022 10:35 AM IST

Kartik Aaryan on 76th Independence Day: कार्तिक आर्यनने तरुणांवरील वाढत्या दबावाबद्दल सांगत म्हटलं, या गोष्टींबद्दल फारच कमी बोललं जातंय. अजूनही आपल्याला कशापासून खरं स्वातंत्र्य मिळायला हवं याबद्दल त्याने सांगितलं आहे.

कार्तिक आर्यन
कार्तिक आर्यन

बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनने काही वर्षातच बॉलिवूडमध्ये वेगळं स्थान निर्माण केलं आहे. आजच्या काळात इंडस्ट्रीतील काही प्रसिद्ध आणि लोकप्रिय स्टार्समध्ये त्याचा समावेश केला जातो. ७५ व्या स्वातंत्र्यदिनी, कार्तिकने या खास दिवसासोबतच भारत मातेबद्दलची त्याची भक्ती आणि प्रेम व्यक्त केलं. तसंच आपल्याला आणखी कोणत्या गोष्टींपासून स्वातंत्र्य मिळायचं आहे याबद्दलदेखील त्याने लिहिलं.

हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला, 'मला माहीत नाही की आपण या गोष्टींना 'स्वातंत्र्य' म्हणून पहावे की नाही, परंतु तरुणांच्या मनावर जो दबाव निर्माण केला जात आहे तो दूर करणं आवश्यक आहे. एखादं मूल शाळेत असल्यापासून ते पदवीधर होईपर्यंत असे अनेक प्रसंग येतात जेव्हा त्यांच्यावर नेहमीच दबाव असतो. कार्तिक पुढे म्हणाला, 'त्यांचा अभ्यास, त्यांनी कोणती स्ट्रीम निवडावी , कोणता व्यवसाय निवडावा, अनेक वेळा हे निर्णय मुलं घेत नाहीत तर त्यांचे कुटुंब आणि पालक घेतात. हे खूप वाईट आहे कारण तरुण विचारसरणी ज्यामध्ये स्वतःमध्ये नवीन गोष्टी शोधण्याच्या दृष्टीने भरपूर क्षमता आहे. त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे करायला मिळत नाही आणि मग ते नैराश्यात जातात. हा दबाव अगदी लहानपणापासून सुरू होतो आणि बराच काळ असतो.

कार्तिक म्हणाला की, 'या गोष्टींबद्दल फारच कमी बोललं जातं आणि काही वेळा ते माणसाच्या मानसिक आरोग्यासाठी चांगलं नसतं. त्यामुळे मला आशा आहे की कोणत्याही मार्गाने शक्य असेल, जर ही समस्या संपवण्याचा कोणताही मार्ग असेल आणि आपल्या तरुणांना योग्य दिशा दिली तर चांगलं भविष्य घडवू शकतो.' कार्तिक आर्यनच्या आई-वडिलांची इच्छा होती की त्याने इंजिनियर व्हावे तर त्याला नेहमीच अभिनेता व्हायचं होतं.

IPL_Entry_Point