मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Urfi Javed: उर्फी जावेदच्या कपड्यांवरून भलताच राडा! ‘स्प्लिट्सविला’मध्ये एन्ट्रीलाच सुरु झाला ड्रामा

Urfi Javed: उर्फी जावेदच्या कपड्यांवरून भलताच राडा! ‘स्प्लिट्सविला’मध्ये एन्ट्रीलाच सुरु झाला ड्रामा

Harshada Bhirvandekar HT Marathi
Nov 16, 2022 11:55 AM IST

Urfi Javed: ‘बिग बॉस ओटीटी’मधून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री उर्फी जावेद आता एमटीव्हीच्या ‘स्प्लिट्सविला’मध्ये सहभागी झाली आहे.

Urfi Javed
Urfi Javed

Urfi Javed: आपल्या हटके फॅशन सेन्समुळे नेहमीच चर्चेत राहाणारी अभिनेत्री उर्फी जावेद हिच्या कपड्यांवर प्रचंड वाद होताना पाहायला मिळतोय. कधी काचेचे तुकडे, तर कधी फुलं आणि प्लास्टिकने अंग झाकणारी उर्फी जावेद तिच्या याच हटके कपड्यांमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. ‘बिग बॉस ओटीटी’मधून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री उर्फी जावेद आता एमटीव्हीच्या ‘स्प्लिट्सविला X४’मध्ये सहभागी झाली आहे. मात्र, या शोमध्येही एन्ट्री करताच उर्फीच्या कपड्यांवरून पुन्हा राडा झालेला पाहायला मिळाला.

सध्या अनेक जण उर्फीच्या कपड्यांविषयी बोलताना दिसत आहेत. तर, उर्फी देखील प्रत्येकाला आपल्या भाषेत उत्तर देताना दिसतेय. ‘स्प्लिट्सविला X४’मध्ये सहभागी होताच पुन्हा एकदा यावरून वाद निर्माण होताना दिसला. ‘स्प्लिट्सविला X४’मध्ये एन्ट्री घेताच स्पर्धक साक्षी द्विवेदी हिच्यासोबत उर्फीचे खटके उडालेले पाहायला मिळाले. या वादाची सुरुवात साक्षी द्विवेदीने केली होती. साक्षीने उर्फीच्या कपड्यांवर आणि तिच्या फॅशन सेन्सवर टीका केली. यावर दोघींमध्ये चांगलीच तूतू-मैंमैं पाहायला मिळाली.

साक्षीने उर्फीच्या कपड्यांवर बोलताच शांत बसेल ती उर्फी कशी... उर्फीने देखील साक्षीला तिच्या सोशल मीडिया चाहत्यांवरून बोल लगावले. उर्फी म्हणाली, ‘साक्षी द्विवेदी मी तुला चांगलीच ओळखते. १ मिलिअन फॉलोअर आणि अवघे ७ हजार लाईक्स.. आधी जाऊन स्वतःचा चेहरा बघ..’ इतकेच नाही तर, यापुढे अशी एखादी टिप्पणी केल्यास गाठ माझ्याशी आहे, अशी तंबी देखील उर्फीने दिली. दोघींचा वाद पाहून या शोचे होस्ट अभिनेत्री सनी लिओनि आणि अभिनेता अर्जुन बिजलानी देखील शांत उभे राहिले होते.

एमटीव्हीच्या ‘स्प्लिट्सविला’ हा एक डेटिंग शो आहे. सध्या या शोचा चौदावा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या शोमध्ये सहभागी होण्यासाठी आपण उत्सुक असल्याचे उर्फी अनेकदा म्हणाली होती. अखेर तिची ही इच्छा पूर्ण झाली आहे. या शोमध्ये आता उर्फीची एन्ट्री झाल्यानंतर स्पर्धेला आणखी रंगत येणार आहे.

IPL_Entry_Point

विभाग