मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Hari Om: जगणारे ते मावळे होते, जगवणारा तो महाराष्ट्र; 'हरी ओम' येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Hari Om: जगणारे ते मावळे होते, जगवणारा तो महाराष्ट्र; 'हरी ओम' येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Aarti Vilas Borade HT Marathi
Sep 13, 2022 12:46 PM IST

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूल्यांवर आणि त्यांच्या मावळांच्या निष्ठेवर आधारित 'हरी ओम' येणार प्रेक्षकांच्या भेटीला

हरी ओम
हरी ओम (HT)

महाराष्टाचे आराध्यदैवत, आदरस्थान श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे उमरठचे दोन वीर बंधू मावळे सिंह तान्हाजी आणि सूर्याजी यांच्या शिवप्रेमाला प्रेरित झालेल्या दोन भावंडांची कथा म्हणजेच 'हरिओम' लवकरच येतोय प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जगणारे ते मावळे होते, जगवणारा तो महाराष्ट्र होता. मर्दानी छातीचे, कर्तव्यदक्ष मावळे आणि संपूर्ण महाराष्ट्राचे आदरस्थान म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूल्यांवर आणि त्यांच्या मावळांच्या निष्ठेवर आधारलेला सिनेमा म्हणजे 'हरी ओम.'

नुकताच 'हरी ओम' चित्रपटाचा मोशन पोस्टर प्रदर्शित झाला आहे. भगवा झेंडा, डोळे दिपतील अशी महाराजांची झलक आणि पिळदार शरीरयष्टी, सळसळत्या रक्ताचे, निधड्या छातीचे दोन भाऊ म्हणजेच नव्या युगातील मावळे हरी आणि ओम आपल्याला या मोशन पोस्टर मध्ये दिसले. हरिओम घाडगे आणि गौरव कदम , सलोनी सातपुते, तनुजा शिंदे प्रमुख भूमिकेत आपल्याला दिसणार आहेत.
आणखी वाचा : 'या' दिवशी होणार चंद्रमुखी सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर

सर्व प्रेक्षक वर्ग ज्याची आतुरतेने वाट पाहत होता ते म्हणजे या चित्रपटाची तारीख घोषित झालेली आहे. आशिष नेवाळकर व मनोज येरुणकर लिखित आणि दिग्दर्शित 'हरी-ओम' हा चित्रपट १४ ऑक्टोम्बर ला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून हरिओम घाडगे यांनी एक कलाकार आणि निर्माता म्हणून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे. नव्या पिढीला शिवबांच्या विचारधारेने प्रेरित झालेल्या हरी आणि ओम या आजच्या युगातील मावळ्यांची आणि महाराष्ट्रातील मराठी माणसाला एकतेचे संदेश देणारा हा चित्रपट आहे.

IPL_Entry_Point

विभाग