
मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माते म्हणून नागराज मंजुळे ओळखले जातात. त्यांचा घर बंदुक बिरयानी या चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात थोडी हटके कथा दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. अशातच आता चित्रपटातील मोस्ट वॉन्टेड गुंड गँग समोर आली आहे.
हेमंत जंगल अवताडे दिग्दर्शित 'घर बंदूक बिरयानी' चित्रपटातील सयाजी शिंदे, नागराज मंजुळे, आकाश ठोसर आणि सायली पाटील हे प्रमुख कलाकार सर्वांसमोर आल्यानंतर आता चित्रपटातील मोस्ट वॉन्टेड 'डाकू गँग' समोर आली आहे. सोशल मीडियावर या 'डाकू गँग'चे पोस्टर्स प्रदर्शित झाले आहेत. या गॅंगमध्ये श्वेतांबरी घुडे, विठ्ठल काळे, नीरज जमगाडे- मायकल, सोमनाथ अवघडे, संतोष व्हडगीर (नाईक ), ललित मटाले, प्रवीण डाळिंबकर, किरण ठोके, सुरज पवार, किशोर निलेवाडी, प्रियांशू छेत्री- बाबू , सुभाष कांबळे, गिरीश कोरवी, चरण जाधव, अशोक कानगुडे, आशिष खाचणे यांचा समावेश आहे. या डाकू गँगची सुनावणी येत्या ७ एप्रिलला जवळच्या चित्रपटगृहात होणार आहे.
या 'डाकू गँग'च्या झळकलेल्या पोस्टरवर त्यांनी ॲक्टिंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आता सुनावणीदरम्यान काय निकाल लागणार, याकडे आता प्रेक्षकांचे लक्ष लागून राहिले आहे.
या कलाकारांबद्दल नागराज मंजुळे म्हणतात, "या सगळ्या कलाकारांचे काम मी पाहिले आहे. काहींसोबत काम केले आहे. हे सगळेच कलाकार खूप मेहनती आहेत. सर्वांनीच खूप चांगले काम केले आहे. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातील हे कलाकार असल्याने प्रत्येकाची एक वेगळी शैली आहे. त्यामुळे त्यांचा अभिनय हा अधिक नैसर्गिक वाटतो."
संबंधित बातम्या
