मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Gautami Patil: “मी वाईट...", प्रिया बर्डे यांना गौतमी पाटीलचे रोखठोक उत्तर

Gautami Patil: “मी वाईट...", प्रिया बर्डे यांना गौतमी पाटीलचे रोखठोक उत्तर

Aarti Vilas Borade HT Marathi
Apr 12, 2023 02:37 PM IST

Gautami Patil: काही दिवसांपूर्वी प्रिया बेर्डे यांनी गौतमी पाटीलवर निशाणा साधला होता. आता गौतमीने त्यांना उत्तर दिले आहे.

प्रिया बेर्डे
प्रिया बेर्डे

आपल्या लावणीने आणि सौंदर्याने सगळ्यांना घायाळ करणारी गौतमी पाटील नेहमीच चर्चेत असते. तिने महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी लावणी करत प्रेक्षकांना वेड लावले आहे. अनेक खेड्यापाड्यात तिच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते आणि या कार्यक्रमांना तुफान गर्दी झाल्याचे पाहायला मिळते. गौतमी पाटीलकडून अश्लील नृत्य होत असल्याचा आरोप वारंवार होत आहे. त्यातच प्रिया बेर्डे यांनी गौतमीचा कार्यक्रम पाहणे बंद करा असे म्हटले होते. त्यावर आता गौतमीने प्रतिक्रिया दिली आहे.

प्रिया बेर्डे यांनी नुकतीच एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी गौतमीच्या डान्स शोवर प्रतिक्रिया दिली आहे. 'या सर्व गोष्टीला बघणारे जबाबदार आहेत. अशा प्रकारची गाणी, तमाशा चवीने बघणारे जो पर्यंत हे शो बंद करत नाहीत, तोपर्यंत या गोष्टी बंद होणार नाहीत. आम्ही आणि राज्यकर्ते यांनी कितीही ओरडून आणि निषेध करून काही होणार नाही' असे प्रिया बेर्डे म्हणाल्या होत्या.
वाचा: वडील आणि मुलासोबत झोपणारी अभिनेत्री...; सेलिना जेटलीचे ट्रोलरला सडेतोड उत्तर

आता गौतमीने माध्यमांशी संवाद साधला तेव्हा तिला "प्रिया बेर्डेंच्या वक्तव्यावर तुमची प्रतिक्रिया काय?" असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर गौतमीने उत्तर देत “मी वाईट काय करतेय हे त्यांनी दाखवावे” असे म्हटले आहे.

गौतमीच्या कामाविषयी बोलायचे झाले तर तिची लावणी संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय ठरत आहे. नुकताच तिचे तेरा पता हे गाणे प्रदर्शित झाले आहे. या गाण्याला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. आता ती 'घुंगरू' या मराठी चित्रपटात दिसणार आहे. सर्वजण तिच्या या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत.

IPL_Entry_Point

विभाग